Saturday, March 22, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वर  पाचगणी  इको सेन्सेटिव्ह झोन समितीची बैठक संपन्न

महाबळेश्वर  पाचगणी  इको सेन्सेटिव्ह झोन समितीची बैठक संपन्न

सातारा, दि. 17 (जिमाका) : उच्चस्तरीय  संनियंत्रण समिती (महाबळेश्वर  पाचगणी  इको सेन्सोटिव्ह झोन समितीची)  दुसरी बैठक नुकतीच दरबार हॉल, राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली.   बैठकीत घनकचरा व्यवस्थापनाबाबत  महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिका व महबळेश्वर –पाचगणी शहरांलगतच्या ग्रामपंचायतींनी प्रभावी अंमलबजावणी  करावी . घनकचऱ्याचे वर्गीकरण करावे. ग्रामपंचायत स्तरावर डंम्पिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्याने  सध्या ग्रामपंचायतींनी सुका कचरा नगरपालिकांच्या  अधिकृत डंम्पिंग ग्राऊंड मध्ये कचरा टाकावा . महाबळेश्वर – पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोन प्लॅस्टीक मुक्त व्हावा या उद्देशाने नगरपालिकेने  व वन विभागाने प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी  जनजागृती करावी . वन विभागाने  पर्यटकांसाठी  ठिकठिकाणी  वॉटर  एटीएम युनिट बसवावेत. पोलो ग्राऊंडचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी करता येणर नाही. वाहतुक नियंत्रीत करण्यासाठी तसेच वाढीव पार्किग व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी  नगरपालिका व पोलीस  खात्याने ट्रॅफिक प्लॅन (वाहतुक आराखडा ) व पार्किग आराखडा  तयार करावा. यावेळी महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईट  ते जावली  गाव ते प्रताप गड महाप्रताप केबल कार नियेजित प्रकल्पाचे  सादरीकरण्सं बंधित संस्थेमार्फत करण्यात  आले . तसेच समितीपुढे प्राप्त झालेले विविध परवानगीचे अर्ज तसेच अन्य दैनंदिन अर्ज, निवेदने याबाबत चर्चा करुन निर्णय घेणेत आले अशी  माहिती उच्चस्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन व सदस्य सचिव डॉ.कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सातारा यांनी दिली .   या बैठकीसाठी जिल्हा व तालुकास्तवरील सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular