म्हसवड : सर्व सामान्य जनतेच्या छोट्या – मोठ्या कामासाठी कायम झटणार्या तरूण, तडफदार, शांत व संयमी असलेल्या धनगर समाजातील युवा नेतृत्वास म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भुषविण्याचा मान म्हणजे पक्षाने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आल्याची भावना म्हसवडकर जनतेतून व्यक्त होत आहे.
म्हसवड नगरपालिकेला सुमारे 159 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. या पालिकेचे नगराध्यक्ष पद अनेक दिग्गजांनी भुषविले आहे. गत पंचवार्षिक पालिका निवडणूकीमध्ये आ. जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हांवर निवडणुक लढविली गेली होती. या निवडणुकीमध्ये आ. गोरे गटाचे 17 पैकी 14 नगरसेवक निवडुण आले होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली विरकरवाडी येथील धनगर समाजातील शांत, संयमी, तरूण तडफदार युवा नेते रवींद्र मधुकर विरकर हे निवडणुकीत उभे राहिले व विक्रमी मताने विजयी करून लोकांनी त्यांनी केलेल्या समाजसेवेची जणू पावतीच त्यांना दिली.
गत आठवड्यांमध्ये आ. जयकुमार गोरे यांनी कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदी संधी देण्याचे धोरण राबविले असून तत्कालीन नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीरामा दिला असता भाऊजी रविंद्र विरकर यांना नगराध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी आदेश दिले. उद्या दि. 7 रोजी रविंद्र विरकर म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
रविंद्र विरकर यांचा विरकरवाडी सारख्या वाडी मध्ये धनगर समाजात जन्म झाला. ज्या समाजात जन्म झाला त्या समाजाचे दु:ख दारिद्ˆय त्यांनी लहानपणापासून जवळून पहिले. त्यांनी विरकरवाडी व परिसरातील लोकांची अनेक कामे सामाजिक बांधिलकी माणून केली आहेत. ते नेहमीच समाज कार्यात झोकून देवून काम करत असत. ते येथील नागेश्वर गणेश क्रीडा सामाजिक सांस्कृतिक मंडळाचे सलग 15 वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे येवू नयेत म्हणून अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली असून मंडळाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारूडे, कीर्तने, प्रवचने असे अनेक धार्मिक कार्यक्रम केले आहेत. तर माता अहिल्यादेवी यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावे म्हणून अहिल्या उत्सव समिती स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
विरकर हे सध्या माणदेशी बँकेत कार्यरत असून बँकेच्या चेअरमन चेतना सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली माणदेशी फौंडेशन या संस्थेच्या कामात ते नेहमीच अग्रेसर असतात.अशा विविध समााजिक कार्यात कायम आघाडीवर असणार्या रविंद्र विरकर यांना आ. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष विजय भाऊ सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 33 व्या वर्षी म्हसवडच्या नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. कारण त्यांनी आतापर्यंत एक विश्वास, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा विश्वास संपादन केला म्हणूनच नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली आहे.
आ. जयकुमार गोरे भाऊ यांनी विरकर यांच्या कार्याचा गौरव नगराध्यक्षपद देऊन केल्याची भावना म्हसवडकर/विरकरवाडी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.