Wednesday, March 19, 2025
Homeठळक घडामोडीडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात स्वच्छता मोहीम * सातारा, कराड, वाई, पाटण,...

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात स्वच्छता मोहीम * सातारा, कराड, वाई, पाटण, मेढा, कोरेगाव, महाबळेश्‍वर, फलटण वडूज, शिरवळ येथे मोहीम संपन्न ** हजारो श्री सदस्यांचा सहभाग * सातारा येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ *

सातारा : संत विचारांतून समाजपˆबोधनासह सामाजिक कार्याचा अखंडित उपक्रम राबविणार्‍या रेवदंडा (जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पˆतिष्ठानमार्फत बुधवार, दि. 1 मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण भारतभर बुधवारी हे अभियान राबविण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यात सातारा शहर, कराड, मेढा, वाई, पाटण, कोरेगाव, शिरवळ, वडूज, महाबळेश्‍वर, फलटण येथे हजारो श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी 3235 श्री सदस्यांनी जिल्ह्यात 130 टन कचर्‍याची विल्हेवाट लावली.
दरम्यान, सातारा येथील मोहिमेचा शुभारंभ खा.श्री.. उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, अतिरिक्त जिल्हा पोलीसपˆमुख विजय पवार, सिव्हील सर्जन डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त सिव्हील सर्जन डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा मुख्य न्यायाधीश बी. यु. देबडवर, जिल्हा न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, ए. एन. सिरसिकर व इतर न्यायाधीश, उपपˆादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, उपनगराध्यक्ष राजू भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे, इर्शाद बागवान, नगरसेवक यशोधन नारकर, वसंत लेवे, किशोर शिंदे, सविता फाळके, श्रीकांत आंबेकर, राम हादगे, महेश पवार यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पˆतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा, उमेशदादा व राहुलदादा यांची पˆेरणा व मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात आज हे अभियान पार पडले. बुधवारी सकाळी 8 वाजता ठिकठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस पˆारंभ झाला. स्वच्छतेसाठी पˆतिष्ठानमार्फत सदस्यांना हातमोजे, मास्कचे वाटप करण्यात आले. स्वच्छता करण्यासाठी सदस्यांनी खराटे, घमेली, खोरी, दाताळी, मोठी पोती व गाड्यांची सोय केली होती. या अभियानाला स्थानिक नगरपालिका, नगरपंचायत, गˆामपंचायत व विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी सहकार्य केले. पालिकांनी गाड्या व कर्मचार्‍यांचीही सोय केली होती.
दरम्यान, सातारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खा.श्री.. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले की, श्री समर्थ बैठकीतून समाजमन खर्‍या अर्थाने सशक्त व सदृढ होते. धर्माधिकारी पˆतिष्ठानचे सामाजिक कार्य स्तुत्य आहे. कलुशीत मनाला स्वच्छ करण्याचे कार्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बोधातून होत आहे. पˆतिष्ठानच्या पˆत्येक कार्याला आपले सहकार्य असेल, असे खा. उदयनराजे म्हणाले.

chandrasen jadhav1
नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, डॉ. धर्माधिकारी पˆतिष्ठानचे खर्‍या अर्थाने सामाजिक कार्यात योगदान आहे. श्री सदस्यांनी सातार्‍यात वेळोवेळी स्वच्छता अभियानासह अनेक उपक्रम राबविले आहेत. स्वच्छता अभियानात पालिका कर्मचार्‍यांचेही नेहमी सहकार्य असते.
सिव्हील सर्जन डॉ. श्रीकांत भोई म्हणाले, डॉ. धर्माधिकारी पˆतिष्ठानने खर्‍या अर्थाने समाजसेवेची लोकचळवळ सुरू केली आहे. आध्यात्मातून मनाचे शुद्धीकरण करण्याबरोबरच स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरांतून सदृढ आरोग्याचा संदेश दिला आहे. सदस्यांचे शिस्तबद्ध व नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे.
कराड येथील मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार अजित खराडे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक राजेंद्र माने, चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वाई येथे नगराध्यक्षा पˆतिभा शिंदे, नगरसेवक भारत खामकर, पˆदीप चोरगे, सौ. जायगुडे, पिˆयांका डोंगरे, सीमा हागिर, रूपाली वनारसे, चरण गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेढा येथे तहसीलदार रोहिणी आखाडे, बीडीओ गजानन भोसले व नगरसेवक उपस्थितीत होते. वडूज येथे उपनगराध्यक्ष संदीप गोडसे, नगरसेवक वचन शहा, पो.नि. यशवंत शिर्के, मुख्याधिकारी माधव खांडेकर उपस्थित होते. शिरवळ येथे सरपंच छायाताई जाधव, जि.प. सदस्य व उपसरपंच उदयदादा कबुले यांच्यासह गˆामपंचायत सदस्य उपस्थित होते.
शिरवळ येथे सकाळी 8.30 वाजता मोहिमेचा शुभारंभ झाला. दु. 12.30 वाजेपर्यंत मोहीम सुरू होती. गावातील शाळा, कार्यालये व पˆमुख सर्व मार्गांवर स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी 350 श्री सदस्यांनी केवळ साडेतीन तासात साडेतीन टन कचरा गोळा केला.
महाबळेश्‍वर येथे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, मुख्याधिकारी आशा राऊत व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
जिल्ह्यात 130 टन कचर्‍याची विल्हेवाट
सातारा येथे 1186 सदस्यांनी 46.05 टन, कराड येथे 548 सदस्यांनी 22.05 टन, मेढा येथे 284 सदस्यांनी 11 टन, पाटण येथे 495 सदस्यांनी 15.03 टन, तर वाई येथे 404 सदस्यांनी 18 टन कचर्‍याची विल्हेवाट लावली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular