पुसेगाव : ललगुण व परीसरातील येरळा नदी पात्रातील वाळुची मोठया प्रमाणात उपसा सुरू असुन वेळोवेळी प्रशासनाला तक्रार केली तरी प्रशासनाने याची दखल न घेतल्याने ललगुण मधील शेतकरी आक्रमक झाले. वाळ उपासा बंद करावी या मागणी साठी ललगुण व परीसरातील शेतकरी आणि नागरीकांनी फलटण- पुसेगाव रस्त्यावर रस्तारोखो केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी वाळु उपसा कराणारी वाहने आणि यंत्र बंद केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला. या वाळु उपशामुळे शेतकर्यांच्या विहीरी मोठया प्रमाणात आटल्याने शेतीवर याचा गंभारी परीणाम पाहायला मिळत आहे. शेतकरी वर्गाल आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे या सदर्भांत श्री साळुंखे सर्कल यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले
यावेळी जेष्ठ नागरीक तथा जलयुक्त शिवार योजनेचे प्रमुख जनार्दन घाडगे म्हणाले या वाळु उपशावर प्रशासनाचा कसलाच अकुंश नसल्याने प्रचंड प्रमाणात वाळु उपसली जात आहे त्यामुळे नदी काठावरील विहीरींची पाणी पातळी खालवली आहे. ललगुण गावाला पाणीवाटप करणारी विहीरीची वेगळी आवस्था नाही एकीकडे जलयुक्त शिवार योजनमुळे पाणी पातळी वाढली असताना या वाळु उपशाचा प्रचंड मोठा परीणाम पाणी पातळीवर होत आहे. नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पाडल्याने शेतमध्ये कामाला जायाचा प्रश्न निर्माण झाला असुन या वाळु उपशामुळे जनावरांना शेतात घेउन जाताना अडचणी येत आहे. ठेकेदारांनी वाळु उपसा करण्याची मर्यादा ओलांडली असतानाही तहसीलदार,सर्कल गांधारीच्या भ्ाुमिकेत आहे.जर ही वाळु उपसा बंद झाली नाहीतर ललगुण ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जलयुक्त शिवारचे अध्यक्ष जनार्दन घाडगे यांनी दिला.
सर्व ग्रामस्थांनी नदी पात्रातील वाळु उपसा करणारी वाहने बंद करून वाळु उपसा करण्यास मज्जाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला पुसेगाव पोलीस प्रमुख राजेंद्र सावंते्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी माजी जि.प सदस्य मानाजी घाडगे,पंचायत समिती सदस्य कैलास घाडगे,सरपंच धनाजी घाडगे,संतोष घाडगे,प्रताप घाडगे,सागर घाडगे, तुषार घाडगे,विनोद घाडगे, यांच्यासह ललगुण,नवलेवाडी,नागनाथवाडी या ठीकाणीचे ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते
वाळु उपशाच्या विरोधात ललगुण ग्रामस्थांचा रास्तारोखो
RELATED ARTICLES