म्हसवड : लोधवडे ता.माण येथील पुणे स्थित उद्योगपती रामदास माने यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने यंदाचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार खासदार रुपा पाटील – निलंगेकर यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला.
भारतमातेचा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या महापुरुषांची गाथा सांगणारा पोवाडा अथक परिश्रम, जिद्द व आत्मविस्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या व्यक्तींचे प्रेरणादायी विचार या सगळ्याला श्रोतृवर्गाची मिळालेली दिलखुलास दाद याने पुणे- पिंपरी येथे काव्यमित्र या संस्थेचा हा तब्बल ऐंशीवा हा पुरस्कार सोहळा चांगलाच बहरला. यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ.विवेक क्षीरसागर ,सामाजिक कार्यक्रर्ते प्रदीप वाघ,मुख्याध्यापक बाळकृष्ण कुलकर्णी, काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर,कृषि तज्ञ रश्मीकुमार अब्रोल, शाहिर परिषदेचे अध्यक्ष हेमंत मावळे इत्यादी उपस्थित होते. पुणे येथील माने ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रामदास माने राष्ट्रीय स्वच्छता अभियानात सहभागी होऊन माफक किंमतीत रेडीमेड शौचालये निर्मिती सुरु केली व महाराष्ट्रासह इतर राज्यातही हजारोंच्या संख्येने या शौचालयाचे वितरण केले.
अल्प किंमतीत व दिर्घ वर्षे टिकाऊ या अत्याधुनिक शौचालयाची केवळ एकाच तासाच्या अवधि जोडणी करुन लगेचच वापरातही आणणे शक्य होत असल्याने या शौचालयास महाराष्ट्रासह पर राज्यातीलही सरकार कडुन हजारोंच्या संख्येने मागणी होत असुन ती माने हे तातडीने अल्पावधीतच पुर्णही करण्यात यशस्वी होत असतात.गरीब कुटुंबानाही शौचालयाची सुविधा मिळावी या उदात्त हेतुने माने यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका देऊन मागणी केल्यास सासरच्या संबंधित कुटुंबाची पडताळणी करुन नववधुस लग्नातील रुकवतात रेडीमेड शौचालय मोफत भेट देण्याचा उपक्रम सामाजिक बांधिलकी व देशाचे पंतधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील स्वच्छ भारत अभियान संकल्पनेत माने यांनी स्वयंफुर्तीने या उपक्रमात स्वत:स वाहुन घेतलेले आहे.
उद्योगपती रामदास माने यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार
RELATED ARTICLES