लोणंद : येथे सत्यसाई सेवा ट्रस्ट संघटना व उत्तर चिदंबरम नटराज मंदीर ट्रस्टच्या वतीने लोणंद येथील पायी वारीतील वारकर्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.
लोणंद येथे या शिबीरासाठी नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानबाग, मुकूंद मोघे,सौ.उषा शानबाग, कु.देवयानी मोघे यांचेसह डॉ. श्री व सौ. ऋषिकेश निकम, वाई येथील डॉ.पोद्दार, डॉ.संभाजी निपाणे आदींनी सुमारे 400 पुरूष व महिला वारकर्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार केले.
सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नटराज मंदीराच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून या आरोग्य शिबीरातून वारकर्यांसाठी ही सेवा देण्यात आली