* डोंगर पोखरल्याने गटारे मुजली
भिलार : पाचगणी हून कुडाळ-पाचवडकडे जाणार्या काटवली घाटाकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असुन त्यांच्या कामचुकारपणामुळे वाहनचालक व नागरीकांना अपघातांना सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापुर्वीच्या आपत्ती नियोजनाचे तीनतेरा वाजले असुन घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. काही ठिकाणी धनदांडग्यानी डोंगर पेाखरल्याचे नादात गटर्सही मुजवल्याने पुर्ण पाणी रस्त्यावरून वहात आहे.वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाल्याचेही सोयरसुतक बांधकाम विभागाला नाही. अपघात झाल्यांनतर हा विभाग जागा होणार का ? असा सवाल वाहनचालकांमधुन केला जात आहे.
पाचगणी हून करहर-कुडाळकडे जाणारा काटवलीपर्यंतचा घाटरस्ता नेहमीच समस्यांचे लक्ष बनत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जुजबी कामे करून आपली तत्परता दाखवत आहे. सध्या पावसाचे दिवस असुन या घाटाच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यकता आहे पंरतु तसे होताना दिसत नाही. परवाच्या पावसात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अर्धा दिवस घाट वाहतुकीसाठी बंद झाला पंरतु बाधंकाम विभागाला याचे कसलेही सोयरसुतक नाही काळी ठिकाणावरील झाडे वाहनचालक व ग्रामस्थंानीच स्वता गरजेपोटी बाजुला काढली. पंरतु घाटाच्या प्रांरभी संजीवन नाक्यावर एक महाकायवृक्ष पाच दिवसापुर्वी उन्मळून पडला. नागरीक व वाहनचालकांनी रस्ता होण्यापुरत्या जुजबी फांद्या तोडून रस्ता सुरळीत केला. आजही तो वृक्ष आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यातील वृक्ष दिसत नसल्याने बरेच अपघात या ठिकाणी घडले आहेत.
तर पावसाळ्यापुर्वीचे कसलेही नियोजन केलेले दिसत नाही. दरडी कोसळल्याने त्या पुर्ण रस्त्यात येत आहेत. तर गटर्स त्यामुळे मुजली आहेत. ती ही उकरली नाहीत. काही धनदांडग्यानी डोंगर पोखरल्याने तो रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे गटर्सची त्यांनी गायब केले आहेत त्यामुळे गटर्सचे सर्व पाणी रस्त्यावरून वहात आहे. त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तर डांबरीकरणाच्या वेळी ज्या ठिकाणी मोर्या टाकल्या आहेत त्या ठिकाणचे डांबरीकरणच केलेले नसल्याने त्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहने त्या ठिक़ाणी आपटुन अपघात होताहेत. याकडे दुर्लक्ष आहे.
अशी सर्व घाटाची दुरावस्था असतानाही अधीकारी मात्र मुग गिळुन गप्प आहेत. या घाटाकडे व रस्त्याकडे लक्ष देणारे कोणी आहे की नाही ? असा सवाल वाहनचालक करू लागले आहेत. का नुसतेच वारंवार खडे मातीने भरून बिले काढली जात आहेत ? की मोठ्याच कामांसाठी बांधकाम विभाग कार्यरत रहाणार ? याचीही चर्चा चालु आहे. किती अपघातांनतर हा विभाग जागा होणार असा प्रश्न वाहनचालकांनी केला आहे