सातारा : एकता आणि शिस्त हे ध्येय घेवून कार्यरत असणार्या राष्ट्रीय छात्र सेनेमधून देशप्रेम आणि आदर्श नागरीकत्वाचे धडे भारतीय तरुणांना दिले जातात. भारतीय सेना दलाला अधिकारी आणि सैनिक देण्याबरोबर आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी एन. सी. सी. ने दिलेले योगदान अमुल्य आहे. 1946 साली भारतात स्थापना केेलेल्या छात्रसेनेचे सातारा येथील बटालीयनची 1962 साली कार्यरत झाले. गेली पन्नास वर्षाहुन अधिक काळ सातारा एन. सी. सी. बटालीयन एक आदर्श बटालीयन म्हणून कार्यरत आहे. सातारा येथील 22 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालीयनचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महागाव येथे सुरु असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या दरम्यान आयोजित या स्थापना दिवस समारोहासाठी पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जि. प. सीईओ कैलास शिंदे तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, बटालियनचे निवृत्त कमांडींग अधिकारी व सातार्यातील अनेक सेवानिवृत्त सेना अधिकारी उपस्थित होते. या वेळी बटालीयनचे माजी छात्रसैनिक असणार्या शहिद कर्नल संतोश महाडीक, अंकूश घोरपडे, रमेश नारे, सुनिल सुर्यवंशी, सचिन काळे यांना आदरांजली वाहण्यात आली.
सदर प्रशिक्षण शिबिर व बटालीयन स्थापना दिवस यशस्वी होण्यासाठी बटालीयनचे कमांडिग अधिकारी कर्नल सुनील माने, अॅडम ऑफिसर कर्नल राजेश कुमार, सुभेदार मेजर संतोष गवस, मेजर डॉ. आर. एस. दुबल, बटालीयनचे सर्व सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले.