Friday, December 1, 2023
Homeसातारा जिल्हाजावळीएक दिवस पक्षासाठी अभियानाचा ९ जुन रोजी शुभारंभ ; राष्ट्रवादी काँग्रेस...

एक दिवस पक्षासाठी अभियानाचा ९ जुन रोजी शुभारंभ ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम.

मेढा / प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ” एक दिवस पक्षासाठी अभियानाचा शुभारंभ शुक्रवार दि. ९ जुन रोजी सकाळी ११ वा मेढा ता .जावली येथे करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार ,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार ‘ आ. शशिकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिपक पवार ,सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती अमितदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये ” एक दिवस पक्षासाठी ” या अभियानाचा शुभारंभ तसेच प्रत्येक गांव निहाय बुथ कमिटया निवडणे बाबत , व पक्ष वाढीबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे . १० जुन हा राष्ट्रवादी पक्षाचा स्थापना दिन असून , त्याचे औचीत्य साधून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन मेढा विकास सोसायटीच्या सभागृहामध्ये शुक्रवार दि. ९ जुन रोजी सकाळी ११ वा . करण्यात आले असून जावली तालुक्यातीत आजी . माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . असे आवाहन जावली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular