Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीदोन युवकात झालेल्या मारामारीत एक ठार

दोन युवकात झालेल्या मारामारीत एक ठार

पुसेसावळी : येथून औंधकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन युवकात झालेल्या मारामारीत दिपक शिवाजी मोरे (वय-35), सध्या- रा.पुसेसावळी, मूळ रा.खटाव) याच्या गुप्तांगावर जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मारहाण केलेला संशयित अमर अनिल चौगुले (वय सुमारे 32), सध्या रा. पुसेसावळी, मूळ जि.कोल्हापूर) याला पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. याबाबत नामदेव आनंदा चव्हाण यांनी पुसेसावळी पोलीसांत तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीसांनी व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मयत दिपक व अमर यांच्यात सकाळपासून बाचाबाची सुरु होती. दरम्यान, पळशी येथून पैसे आणले का याबाबत दोघांत संभाषण सुरु होते.अमर याने पैसे आणले नाहीत असे सांगितल्यावर दोघांत झटापट सुरु झाली होती. त्यात अमर याने गुप्तांगावर लाथ मारल्याने दिपक जागीच कोसळला व जागेवर मयत झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.
सदरची घटना रविवार दि.23 जूनला साडेपाच वाजणेच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी तातडीने संशयित अमर यास ताब्यात घेवून औंध पोलीस स्टेशनला हजर केले.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडणेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी तातडीने घटना स्थळाला भेट दिली.मयत दिपक मोरे याला शवविच्छेदनासाठी औंध येथे पाठविण्यात आले. पुढील तपास स.पो.नि.उत्तम भापकर करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular