कराड :24 ते 28 नोव्हें. दरम्यान, होणार्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनाच्या व्यवस्थापनाने चलनातील नोटा या समस्येवर तोडगा काढत शेतकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी विशेष पर्यायी व्यवस्था केली आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध बँकांचे 8 एटीएम मशीन बसविण्यात येणार असून त्याद्वारे निघणार्या रकमेतून प्रदर्शनामध्ये खरेदी करता येणार आहे, याशिवाय प्रदर्शनामध्ये नियमित चलन व्यवस्थेबरोबरच यशवंत चलन हे विशेष चलन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्राहकांना प्रदर्शनाच्या प्रवेशद्वा रावरच 2000 च्या नोटा किंवा एटीएम/डेबिट कार्ड याद्वारे पाहिजे तेवढे रूपये 100 च्या पटीमध्ये यशवंत चलन बदलून मिळणार आहे त्याद्वारे प्रदर्शनामध्ये कोणत्याही स्टॉलवर खरेदी करता येणार आहे. अशी माहिती गिकृे यांनी दिली.
प्रदर्शनामध्ये औजारे, यंत्रे, सिंचन साधने, ड्रीप, पाईप, बी-बियाणे, औषधे, खते, पुस्तके, नियतकालिके, विविध सेवा, गृहोपयोगी वस्तू, खाद्यापदार्थ यांची खरेदी शेतकरी व प्रदर्शन पाहण्याकरिता येणार्या नागरिकांना करता येणार आहे. याशिवाय खरेदी करून झाल्यावर काही अटींवर उर्वरित रक्कम देखील शेतकर्यांना नियमित चलनाद्वारे परत मिळणार आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शन भरत असून राज्यभरातून 8 ते 10 लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असतात. या प्रदर्शनासाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येत नसून शेतकर्यांना 100 स्टॉल्स मोफत स्वरूपामध्ये दिले जातात.
एकूण 5 दिवस चालणार्या या प्रदर्शनामध्ये 400 पेक्षा जास्त स्टॉल्स बरोबरच पशु पक्षी स्पर्धा, पिक स्पर्धा, फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा, कृषी विभागाचे भव्य दालन, विविध शासनाच्या योजना व महामंडळे यांच्या स्टॉल्सचा समावेश आहे. यावर्षी 12 विविध देशातील कबुतरे, 2 टन वजनाचा रेडा, ट्रॅक्टर ओढणारा बोकड आदि आकर्षणे असणार आहेत.
या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन 24 नोव्हें. रोजी 4 वाजता शेतकर्यांच्या हस्ते होणार आहे. तर 25 नोव्हें. रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने ललिता बाबर यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. सलग 5 व्या वर्षी शुअर शॉट हि इव्हेंट कंपनी या प्रदर्शनाचे नियोजन करीत असून शुअर शॉट ची 70 जणांची टीम प्रदर्शन यशस्वी करण्याकरीता सज्ज आहे. प्रदर्शनास भेट देणार्या शेतकर्यांमधून एका भाग्यवान विजेत्यास ट्रॅक्टर बक्षीस ठेवण्यात आले असून आणखी इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.