कराड ःआजपासून मी स्वदेशी वस्तूंचा वापर करीन. माझ्या देशातील कारागिरांना पाठिंबा देईन. माझ्या देशावर कटकारस्थान करणार्या देशाला माझा एक रुपयासुद्धा जाऊन देणार नाहीफ अशी शपथ घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक कर्मचार्यांनी घेतली.
भारतावर वारंवार कुरघोडया करणार्या चीन या सख्खा शेजारी राष्ट्राच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम संतकृपा शिक्षण संकुलातील सर्व घटकांनी उघडली आहे. दीपावलीसह सर्व सण, उत्सव फटाकेमुक्त साजरे करू, देशासाठी सीमेवर प्राण पणाला लावणार्या जवानांच्या कायम ऋणात आणि बलशाली मातृभूमीच्या अखंडतेसाठी कटिबद्ध राहू, अशीही प्रतिज्ञा या वेळी करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचा आदर्श सर्वानी घेण्यासारखा आहे. भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. इथे सर्व जातिधर्माचे लोक आपापल्या धार्मिक सांस्कृतिक सणाद्वारे आपापली संस्कृती कित्येक वर्षांपासून जपत आहेत. या विविधतेचा फायदा घेत आपले शेजारी राष्ट्र चीन मैत्रीच्या नात्याखाली अनेक वस्तू आपल्या बाजारपेठेत विकत आहेत आणि भारतीय त्या वस्तू खरेदी करून चीनसारख्या धूर्त राष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक बळकट करत आहे. परंतु गेली अनेक वष्रे आपल्या भूभागावर आक्रमण करून अनेक निष्पाप भारतीयांवर, सैनिकांवर हल्ले करणार्या पाकिस्तानला मात्र चीन शस्त्रे व इतर साहित्य पुरवून भारताविरुद्ध लढण्यास प्रोत्साहन देत आहे. हे भारतातील युवकांना समजावे यासाठी तसेच गावोगावी युवकांपर्यंत हा संदेश जावा व इथून पुढे चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शपथ घेऊन घेतला जावा असे आवाहन संतकृपाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कबाडे यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घातल्याची शपथ घेताना या वेळी संतकृपा तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, बीएड कॉलेजच्या प्राचार्या प्रज्ञा पाटील, डी. फार्मसीच्या प्राचार्या वैशाली महाडिक, घोगाव ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य यास्मीन देसाई तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
चायनीज वस्तूंवर बहिष्कार, तर स्वदेशी वस्तूच वापरण्याची शपथ
RELATED ARTICLES