सातारा : सातार्यात येत्या 15 ऑगस्ट रोजी सायबर लॅबचे उद्घाटन होणार असून यामुळे सायबर क्राईमवर आळा बसण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब विभाग सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला सायबर लॅबसाठी 60 लाख रूपयेचा निधी मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस मुख्यालयाच्या आवारात सायबर लॅब सुरू करण्याचे काम चालू झाले. या सायबर लॅबमार्फत सायबर क्राईममध्ये येणारे गुन्हे, फेसबुकवर होणारी फसवणूक, मोबाईल फोन बँक अधिकारी असल्याचे भासवून होणारी आर्थिक फसवणूक, काँम्पुटर हॅकींग करणे, पासवर्ड हॅकींग करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी या लॅबची मदत होणार आहे. सातारा जिल्हत सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सहा कर्मचार्यांची नेमणुक करत एक पोलीस निरीक्षक व एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना स्पेशल ट्रेनिंगसाठी मुंबईला पाठविले आहे. या विभागावर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे नियंत्रण असणार आहे. यापूर्वी सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झालेनंतर याची माहिती मिळविण्यासाठी मुंबईला याची सीडी पाठविण्यात येत होती. त्यामुळे या क्राईमचे उघडकीस येण्याचे प्रमाण फार कमी होते. जिल्ह्यात सुरू होणार्या सायबर लॅबमुळे गुन्हे उघडकीचे प्रमाण वाढणार आहे.
सातार्यात 15 ऑगस्ट रोजी सायबर लॅबचे उद्घाटन
RELATED ARTICLES