पाटण : छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपती संभाजी महाराज… यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) ता. पाटण जि. सातारा येथे शनिवार दि. 11 नोव्हेंबर आणि रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील 4 थे दुर्ग संमेलन आयोजित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत सरदार सत्यजितसिंह पाटणकर व दुर्ग प्रेमीनी किल्ले सुंदरगडाची पाहणी केली. महाराष्ट्रातील चौथे दुर्ग संमेलन पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर होत असल्याने त्याचा सार्थ अभिमान अम्हा पाटण वाशियांसाठी आहे. हे दुर्ग संमेलन भव्य आणि दिव्य करण्यासाठी आम्ही सुंदरगड परिसरातील सर्व मावळे अहोरात्र परिश्रम करत आहोत. रविवारी किल्ल्यावर होणार्या श्रमदान शिबिरात शेकडो मावळे एकवटणार आहेत. असे श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.
इतिहासीक वारसा असलेला सुंदरगड ( घेरादात्तेगड ) हा छत्रपती शिव काळात पाटण महालाचा निगराणी किल्ला म्हणून ओळखला जात होता. या किल्यावरून पाटण महालातील किल्ले वंसतगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड, गुणवंतगड, जंगलीजयगड, भैरवगड, प्रचितगड, या किल्ल्यांची व परिसराची निगराणी राखली जात होती. पाटण महालातील एकमेव कोकण मार्गावर आसलेल्या सुंदरगडाला विशेष महत्व आहे. यामुळे या गडावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठी मावळे, सैन्य यांचे येणे – जाणे होते. अशा या इतिहासीक किल्ल्यावर दोन दिवसीय महाराष्ट्र राज्यातील 4 थे दुर्ग संमेलन होत असल्याने पाटण महालातील छत्रपती शिवप्रेमी, दुर्ग प्रेमी, इतिहास प्रेमी यांना दुर्ग संमेलन अनुभवन्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.
या दुर्ग संमेलनासाठी गडावरील स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, गडावर जाण्यासाठी पायी मार्ग, आधी सुविधांची व्यवस्था हि महत्त्वाची आहे. दुर्ग संमेलनात . महाराष्ट्रातुन येणार्या प्रत्येक छत्रपती शिवभक्ताची व्यवस्था योग्य रितीने होणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी किल्ले सुंदरगड परिसरातील व पाटण महालातील मावळ्यांनी कंबर कसली आहे. सुंदरगडावर श्रमदान करण्यासाठी उस्फुर्त शेकडोच्यां संख्येने मावळे, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते सुंदरगडाकडे कुच करत आहेत. गडावर होणार्या श्रमदानावरूनच दुर्ग संमेलनाची भव्यता आणि दिव्यता जाणवून येत आहे.
या दुर्ग संमेलनासाठी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक छत्रपती शिव अभ्यासक, साहित्यिक, व्याख्याते, दुर्ग प्रेमी इतिहासक उपस्थित राहुन आपले अनमोल छत्रपती शिव विचार मांडणार आहेत. तसेच सुंदरगड दुर्ग संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य व देशातून हजारोंच्या संख्येने छत्रपतींचे अबालवृधांसह मावळे, रगरागिणी उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय दुर्ग संमेलनात इतिहासक कार्यक्रमाची रेल-चेल राहणार असुन या दुर्ग संमेलनाचा सर्व जाती – धर्मातील मराठी मावळ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यायचा आहे.
सुंदरगड घे-यातील सर्व गावातील मराठी मावळ्यांनी या दुर्ग संमेलनात सहभागी होऊन आपल्या मातीत आणि सुंदरगडावर होत असलेल्या दुर्ग संमेलनास न भुतो: न भविष्यतो: असा महान सोहळा यशस्वी करण्याचा विडा आपण उचलला आहे. तर या राष्ट्रीय सुंदरगड दुर्ग संमेलन यशस्वी करण्यासाठी पाटण शहर सुंदरगड परिसरातील छत्रपती शिव मावळ्यांनी कामाला लागून कंबर कसली आहे.असे श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.