भुईंजः 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणार्या शहीदांना रविवारी (दि.26) सकाळी 10 वाजता किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील 26/11 शहीद स्मृति स्मारकामध्ये अभिवादन करून मानवंदना देण्यात येणार आहे. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम होणार असून वीरमाता श्रीमती बनुबाई साहेबराव धुरगुडे (भिरडाचीवाडी) व श्रीमती कमलताई रामचंद्र पवार (कवठे) आणि वीरपत्नी श्रीमती प्रतिभा जयवंत दुधे-पाटील (कडेगाव) यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी दिली.
26 नोव्हेंबर, 2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्यासह जिल्ह्यातील विशेषतः कारखाना कार्यक्षेत्रातील तुकाराम ओंबळे, बापूराव धुरगुडे, अंबादास पवार, जयवंत दुधे-पाटील, बळवंत भोसले शहिद झाले. कारखान्याने सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावनेने 26/11 हल्ल्यातील या शहिद पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे स्मारक कार्यस्थळावर उभारून आजच्या तरूण पिढीला जाज्वल्य देशभक्तीची प्रेरणा दिलेली आहे. गेल्या सहा वर्षांपासून 26 नोव्हेंबरला कारखाना कार्यस्थळावरील या स्मारक परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जात आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही या शहीदांना अभिवादन करून मानवंदना देण्यात येणार आहे.
किसनवीर कार्यस्थळावर रविवारी 26/11 तील शहीदांना अभिवादन
RELATED ARTICLES