कोरेगांव : येथील कोरेगांव शहर विकाय मंचचे वतीने येथील चौथाई गल्लीतील सुशिक्षीत सेवाभावी युवक निलेश नेताजी बर्गे यांच्या युवा मंचला कोरेगांव शहर स्वच्छता अभियानाचे कापडी फलकांचे वितरण करणेत आले.
गाव करू मिळून काम करू, स्वच्छतेचा ध्यास धरू, कचर्याला आळा, रोगराईला टाळा, स्वच्छतेचा संदेश ध्यानी धरू, आरोग्य आपले निरोगी बनवू. इत्यादी स्वच्छता अभियानाचे फलकांचे वितरण मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विध्यमान संचालक किशोर बर्गे यांनी केले.
यावेळी निलेश बर्गे युवा मंचचे जितेंद्र बर्गे, शैलेश पारखी, राहूल चव्हाण, वैभव बर्गे, वैभव वेळापूरे, दयानंद बर्गे, कुलदिप बर्गे सुधीर बर्गे, प्रशांत यादव, सचिन निगडे, आदेश चिनके, शंकर अहिरे, तसेच वृत्तपत्र लेखक रामचंद्र बोतालजी, कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, वसंतराव तात्याबा बर्गे, संतोष गुलाबराव बर्गे विट्ठलराव काटे, आदी मान्यवर उपस्थित होते. वैभव वेळापूरे यांनी आभार मानले.