महाबळेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाबळेश्वरचे नवनिर्वाचित नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांच्या कडून महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभाराबाबत माहिती घेतली . शहर सुंदर बनविण्यासाठी संपुर्ण सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली . यावेळी भारतीय जनता पार्टीचे पक्ष प्रवक्ते माधव भंडारी हे उपस्थित होते.
महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत भा.ज.पा. जिल्हा सरचिटणीस रविंद्र कुंभारदरे यांनी पालिकेच्या नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी घोषित केली होती. महाबळेश्वर मधील प्रभाग क्र. 3 (अ) मधून ते भरघोस मतांनी निवडून आले. यावेळी रविंद्र कुंभारदरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाबळेश्वर हे नावाजलेले पर्यटनस्थळ असल्याने त्याची ख्याती संपुर्ण देशात असून हे सुंदर पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व सहकार्य करु असे आश्वासन कुंभारदरे यांना दिले. तसेच येथिल विविध पर्यावरणाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. रविंद्र कुंभारदरे यांनी यावेळी येथिल केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या शहराच्या विकास आराखड्याबाबत चर्चा केली व तो लवकर लवकर मार्गी लावण्याबाबत त्यांना विनंती केली. शहराच्या विकासाचे चांगले प्रस्ताव आल्यास ते नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाबळेश्वरच्या अनेक समस्यांबद्दल यावेळी चर्चा झाली.