ललिता बाबर सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित
सातारा : आज अतिशय खडतर आणि कठीण परिस्थितीवर मात करत धावण्याच्या देशांतर्गत व आता ऑलिंपिक दर्जाची स्पर्धा व तीही फायनलपयर्ंत पोहचणार्या ललिताला केवळ आमचा नाही तर सार्या देशवासियांचा पाठिंबा, अशिर्वाद आणि शुभेच्छा आहेत.त्यामुळे या सर्वांच्या सदिच्छावरच ललीता पुढील ऑलिंपिकचे पदक निश्चित मिळवेल असा ठाम विश्वास जागतिक किर्तीचे कुस्तीपटू, 16 वेळा राष्ट्रीय हेवीवेट कुस्ती चॅम्पियन, कॉमन वेल्थ व एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेते हिंदकेसरी, पद्मभूषण गुरु सत्पाल सिंग यांनी व्यक्त केला.
सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांतर्फे 1991 सालापासून प्रतिवर्षी ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सामाजिक कार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या सातारा जिल्हयाच्या सुपूत्रास सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे यंदाचा 26 सातारा भूषण पुरस्कार 2016 या सालासाठी रिओ ऑलिपिंकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणार्या ऑलिपिंक धावपटू ललिता बाबर यांना शाहूकला मंदिरात जागतिक किर्तीचे कुस्तीपटू, 16 वेळा राष्ट्रीय हेवीवेट कुस्ती चॅम्पियन, कॉमन वेल्थ व एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेते हिंदकेसरी, पद्मभूषण गुरु सत्पाल सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी सत्पाल बोलत होते.
यावेळी आदरणीय माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. ट्रस्टचे अध्यक्ष अणि ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते व साहित्यिक अरूण गोडबोले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वं मान्यवरांचा सत्कार विश्वस्त अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, उदयन गोडबोले यांचे हस्ते करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ.अच्युत गोडबोले यांनी या पुरस्काराविषयीची माहिती दिली तसेच ट्रस्टने आजवर घेतलेल्या विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यांची माहिती उपस्थितांना दिली.
या पुरस्काराची भूमिका स्पष्ट करताना अरुण गोडबोले म्हणाले की, यापूर्वी या पुुरस्काराने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, श्री. छ. सुमित्राराजे भोसले, प्रा. शिवाजीराव भोसले, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, गुरूवर्य बबनराव उथळे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, यमुनाबाई वाईकर, गिरीश कुबेर, अशा अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. पुरस्काराच्या 2015 या रौप्य महोत्सवीवर्षी रयत शिक्षण संस्थेचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. यावर्षी माण तालुक्यातील मोही गावांजवळच्या बाबर वस्तीमध्ये एका सामान्य शेतकरी कुटूंबात जन्म घेउन प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर जिद्दीने मात करीत ललिता बाबर यांनी जिल्ह्यात, महाराष्ट्रात व देशात प्रगतीच्या एकेक पायर्या पादाक्रांत करीत विजयश्री मिळविली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही यशाची शिखरे पादाक्रांत केली. त्याच्याच बळावर ऑलिपिंकचे पात्रता निकष सहजपणे पूर्ण केल्यामुळे रिओ ऑलिपिंकच्या 3000 मीटर्सच्या स्टिपल चेस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारुन उज्वल कामगिरी केल्याबद्दल व पुढील टोकियोतील स्पर्धेसाठी प्रोत्साहन म्हणून सातारा भूषण पुरस्कार देउन आपला गौरव करण्यात गोडबोले ट्रस्ट व सातारकरांना धन्यता वाटत आहे अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली.
गुरु सत्पाल यांनी ललिताचे सत्कार हे आता शाळा शाळामधुन घ्या ज्यातून पुढील अशा नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल आणि ललितासारखे असे खेळाडू निर्माण होतील असे सांगत मी़ही अगदी 25 पेैशाची कुस्ती पहिल्यंादा जिंकली, त्यामुळे आज मिळालेला हा पुरस्कार हा पैशाने मोठा नाही तर यामागे प्रेम आणि अशिर्वाद मोठे आहेत. व त्यापेक्षा अनुभवातुन जिद्दीने ललिताने सराव करत यश मिळवावे, महाराष्ट्रात मला प्रेम आणि प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच मला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. आजपर्यंत मी ही 3 वेळा आलिंपिक गाठले. आजवर 3 हजार कुस्त्या केल्या आणि याच राज्यात मी कुस्तीही हरलो हे नम्रपणे नमूद करतो.
आपल्या सत्काराला उत्तर देताना ललिताने सर्व देशवासियांच्या पाठबळ आणि शुभेच्छावरच मी अगदी पायाला जखम असतानाही फायनलमध्ये 10 वी आले ही गोष्ट माझे प्रशिक्षक तसेच माझे कुटंबियांपासूनही मी लपवून ठेवली घरच्या आणि तुमच्या सार्यांच्या पाठबळावरच मी आज देशवासियांची अपेक्षा टोकियो ऑलिंपिकमध्ये निश्चितपूर्णं करेन आज हा पुरस्कार माझा घरचा आहे याचा अतिशय मला आनंद वाटतो. आज राज्य भूषण मिळवला नसला तरी जिल्ह्याचा हा पुरस्कार मला मोठे बळ देणारा आहे. आयुक्त प्रभाकर देशमुख व सौ.अनुराधा देशमुख यांच्या सह माण फौंडेशन आणि अनेक संस्थांच्या आर्थिक सहकार्यांनेच मी रिओ पर्यंत धडक मारु शकले. तुमच्या शुभेच्छा माझ्या सदेैव पाठीशी असू दयात.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी राजे भोसले यांनी गोडबोले परीवाराचे हे कायर्ं खरोखरच स्तुत्य आहे, मी याचा अतिशय जवळुन साक्षीदार आहे. ललिताला हा पुरस्कार खरोखरच पाठबळ देणारा आहे. व ती निश्चीत यश मिळवेल असा विश्वास आमहा सार्या देशवासीयांना वाटतो.
याच कार्यक्रमात ललिताचे आई सौ.वंदना व वडील शिवाजीराव बाबर ,ललीताचे शिक्षक ज्ञानेश काळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी सौ. अनुराधा देशमुख आणि या पुरस्कारासाठीचे आकर्षक सन्मानचिन्ह करणारे प.ना. पोतदार व रविंद्र झुटींग यांचाही सत्कार सत्पाल यांचे हस्ते करण्यात आला. तसेच ललिताचा गौरव शिवाजीराव पाचपुते, बळीराजा संस्था, स्व. गजाभाऊ गोडबोले मित्र परिवाराचे वतीने करण्यात आला. सौ. संजीवनी गोडबोलेे यांनी आभार प्रदर्शन केले तर सुत्र संचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले.
या कर्तृत्व गौरव समारंभास माजी आयकर आयुक्त अरुणराव पवार, जयवंत चव्हाण, माजी महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, संभाजीराव पाटणे, राजेंद्र चोरगे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, दिलीप पाठक, रफीक बागवान, बबनराव उथळे, राजेंद्र शेलार, प्रकाश गवळी, खंडूशेठ सारडा, श्रीकांत शेटे, सौ. अनुपमा गोडबाले, डॉ. सौ. अनुराधा गोडबोले, किशोर शेठ नावंधर, रमणलाल शहा सर, चं. ने. शहा सर, सुधीर पवार, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..