महाबळेश्वर : लोकमित्र जनसेवा आघाडीच्या प्रभाग सात मधील महिला उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या साठी लोक मित्र जनसेवा आघाडीचे अध्यक्ष डी एम बावळेकर यांना फोन वरून धमकी देण्यात आली. फोन करणारा व्यक्ती दगडी चाळीतून बोलत असल्याचे सांगत होता बावळेकर यांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून आपल्या जिवीतास धोका असल्याचे म्हटले आहे.
निवडणुकीमध्ये उमेदवार साम दाम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे पालिकेचे वातावरण आत्तापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. शहरात नोंदणीकृत एकमेव लोकमित्र जनसेवा आघाडी आहे. या आघाडीने नगराध्यक्ष पदासह एकुन अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केल्याचे शहरात चित्र आहे. अशा स्थितीत धमकीचे फोन आल्याने येत्या काही दिवसात शहारातील परिस्थिती तणावपुर्ण राहील असा मतदारांकडुन अंदाज व्यक्त केला जात आहे
दरम्यान डी एम बावळेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि 27 आक्टोंबर रोजी मला प्रथम धमकीचा फोन आला समोरची व्यक्ती जुबेदा मुलाणी यांच्या समोर उमेदवार उभा करू नकोस मी दगडी चाळीतुन बोलतो आहे लक्षात ठेव असे बोलुन समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला.
बावळेकर यांनी ही धमकी गांभिर्याने घेतली नाही व या धमकीच्या फोनकडे दुर्लक्ष करून जुबेदा मुलाणी यांच्या समोर हलीमा अहमद नालबंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला दि सात नोव्हेंबर रोजी पुन्हा बावळेकर यांना दगडी चाळीतुन धमकीचा फोन आला या वेळी समोरची व्यक्ती आता बावळेकर यांच्या बरोबर आरे तुरे भाषेत बोलत होती.
व्यक्ती म्हणाली की प्रभाग सात मधील जुबेदा मुलाणी यांच्या विरोधातील अर्ज मागे घे नाहीतर त्याचे वाईट परिणाम होईल तुला बघुन घेईल परत फोन करणार नाही अर्ज मागे घे अशा प्रकारे उध्दट व शिवराळ भाषेत बोलुन दमदाटी देवुन त्या व्यक्तीने फोन बंद केला. पहील्या फोनकडे दुर्लक्ष करणारे बावळेकर यांनी दुसरा धमकीच्या फोनकडे दुर्लक्ष न करता या धमकीच्या फोन बाबत पोलिसात धाव घेतली आहे पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी या बाबत लेखी तक्रार केली तसेच त्यांनी या धमकीच्या फोन मागे गावातील दोन नगरसेवकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करून या धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करून धमकी देणारे व्यक्तींवर कायदेशी कारवाई करण्याची मागणी बावळेकर यांनी केली आहे.
काही दिवसांपुर्वी युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता लोकमित्र जनसेवा आघाडीच्या प्रमुखांनाच दगडीचाळीतुन थेट धमकीचे फोन आल्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलसांपुढे उभे राहीले असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे तसेच पोलिस विभागाने या प्रकरणाची गंभिर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत ही अनेक जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.