सातारा : जिल्ह्यातून तडीपार असलेल्या राजा उर्फ शेंबडा राजा उर्फ रामदास नलवडे रा. मंगळवार पेठ, यास सातारा शहर परिसरात आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातून शेंबडा राजा उर्फ रामदास नलवडे याला तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीचा आदेश असतानाही त्याचा भंग करून शेंबडा राजा मंगळवार पेठ बोगदा परिसरात फिरत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजल्यानंतर त्याला पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. व त्याच्यावर हद्दीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने शाहुपूरी पोलीस ठाण्यात कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. पद्माकर घनवट, पो.उप. नि. गजानन मोरे, सहा. फौ. विलास नागे, पो.हवा. आनंदराव भोईटे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, पो.ना. योगेश पोळ, संतोष जाधव,प्रविण कडव, नितीन भोसले, महेश शिंदे, मारूती आडागळे यांनी सहभाग घेतला होता.