म्हसवड : हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे नवीन 2000 रुपयांची नोट वापरात आल्यामुळे विशेषत: आठवडा बाजारात सुट्ट्या पैशामुळे लोकांची अडचण होऊ लागली आहे. म्हसवड येथील माणदेशी महिला बँक लोकांना 500 रुपये किंमतीची 10 रुपयांची नाणी देऊन ही अडचण दूर करणार आहे.
म्हसवड येथील आठवडा बाजार बुधवार आहे. आठवडा बाजारास येणार्या लोकांची विशेषत: ग्रामीण भागातून येणार्या लोकांची सुट्टे पैसे नसल्याचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. उद्या बुधवार दि. 15 नोव्हेंबर रोजी माणदेशी महिला बँकेच्यावतीने स्टॉल उभारण्यात येणार असून लोकांचा 500 रुपये किंमतीची 12 रुपयांची नाणी बदलून दिली जाणार आहेत. यासाठी जुन्या 500 रुपयांची नोट स्वीकारली जाणार आहे. हे सुट्टे पैसे मिळण्यासाठी माणदेशी बँकेत खाते असणे आवश्यक नाही. परंतु आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यापैक एका ओळखपत्राची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक असल्याचे बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांनी सांगितले.