माने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर

पाटण:- ( शंकर मोहिते ) – तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विवीध स्पर्धात्मक शिष्यव्रुती परिक्षेत माने-देशमुख विद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले आहे. आज या विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा संपन्न होत असताना या विद्यालयातुन आणि या विद्यार्थ्यांमधुन युपीसी, आयपीएस अधिकारी नक्कीच घडतील. माने-देशमुख विद्यालयाची हि यशस्वी भरारी विद्यार्थ्यांसांठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. असे गौरव उद्धगार युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माने-देशमुख विद्यालय पाटण येथे गुणवंतांचा गुणगौरव समारंभ प्रसंगी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधीकारी राजेश क्षिरसागर, मोटे गुरुजी, प्राचार्य सर्जेराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पाटण येथील ऐकट्या माने-देशमुख विद्यालयातील सरासरी पावनेदोनशे विद्यार्थी विवीध परिक्षेत चमकले आहेत. आणि त्यांनी यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनचा त्यांच्या पालकासमवेत ऐकाच वेळी गुणगौरव समारंभ उत्साहात होणे हा एक इतिहासच आहे. या विद्यालयाला गेल्या तीन वर्षापासुन ज्युनियर कौलेज ची जोड मिळाली असुन या कौलेजचा देखिल बोर्डाचा निकाल १०० टक्के आहे. हे हि कौतुकास्पद आहे. पुढील वाटचालीत या विद्यालयातील विद्यार्थी एमपीसी, युपीसी, आयपीएस सारख्या परिक्षेत नक्कीच चमकतील असा विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
यावेळी सभापती राजेश पवार, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थांनचा गुणगौरव समारंभ करण्यात आला. शाळेस भेट स्वरुपात सीसी टिव्ही कैमेरे, एलसीडी स्क्रीन दिलेले मंगेश पाटणकर, शाळेस सतत मदत करणारे मोटे गुरुजी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य सर्जेराव चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करुण प्रस्ताविक केले. तर पर्यवेक्षक पंडीतराव गव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
या गुणगौरव समारंभास माजी सरपंच चंद्रकांत मोरे, आबासाहेब भोळे, दिनकर माथने, शंकर मोहिते, पांडुरंग संकपाळ, राजेंद्र राऊत, सचिन देसाई, यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.