सर्वांणिग विकासासाठी साथ देण्याचे आवाहन
सातारा– सातारा शहराचा वाढता विस्तार, प्रस्तावित हद्दवाढ याचा विचार करुन नगर विकास आघाडीने पुढील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी काय महत्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुनच व्हिजन 2021 निश्चित करण्यात आले आहे. आम्ही आरोप- प्रत्यारोप नाही तर, काम करण्याला महत्व देतो. नगरविकास आघाडीकडे व्हिजन असल्याने आम्ही सातारकरांच्या समस्या सोडवू शकतो. सातारकरांनी पुढील पाच वर्ष सेवा करण्यासाठी संधी द्यावी. सातारकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, असा शब्द नगरविकास आघाडीचे नेते आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल.
शुक्रवारी शहरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पदयात्रेला सकाळी 7 वाजता लक्ष्मी टेकडी येथून सुरुवात झाली. लक्ष्मी टेकडी ते मे. लतीफभाई चौधरी घर, सदरबझार पोलीस स्टेशन, बाजारपेठ ते आमणे बंगला, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, लिलाताई हौसिंग सोसायटी ते मुथा गॅरेज चौक, हॉटेल ग्रीनफिल्ड ते कुबेर विनायक मंदीर, अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी पासून छ. शिवाजी महारा पुतळा पोवई नाक्यावर आल्यानंतर पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेत नविआचे उमेदवार श्रीमती कुसुमताई गायकवाड, संदीप साखरे, लक्ष्मीताई मंगवाणे, विकास धुमाळ आणि अलीम कुरेशी, राहूल धुमाळ, शाहनवाझ शेख, कृष्णा जाधव, श्रीकांत राठोड, अनिल कांबळे, सीताताई चव्हाण, मुथाप्पा कांबळे, मुकाप्पा कोळी, सिंकदर शेख, बाबासाहेब कांबळे, प्रवीण थोरात, शरद गायवाड, उमेश भोसले, राजू रजपूत, चेतन सोलंकी, सुनिल चव्हाण, सादीक बेपारी, सलाम बेपारी, मुज्जक बेपारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उमेदवारांचे औक्षण करुन आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आ. शिवेंद्रसिंहराजे व उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपुलकीचा संवाद साधला आणि नगर विकास आघाडीची भुमिका समाजावून सांगितली. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी वयोवृध्द नागरिकांनी आपल्या हातातील काठी उंचावून पदयात्रेचे स्वागत केले. आपल्या हातातील काठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उमेदवारांच्या हाती देवून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगून या नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. काठीला मत म्हणजेच सातारा शहराच्या विकासाला मत. काठीला मत म्हणजेच सातारकरांच्या अपेक्षांना मत, असे म्हणत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे पदयात्रेत सहभागी होवून उमेदवारांचा जोश वाढवला. सातारकरांच्या आशा आणि अपेक्षा पुर्ण करण्यासाठीच नविआ निवडणूक लढवत असून नागरिकांनी आघाडीच्या प्रत्येक उमेदवारावर विश्वास टाकवा. सातारकरांना हवा असलेला पारदर्शक आणि लोकहिताचा कारभार आम्ही करुन दाखवू आणि सातारकरांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आश्वासन नआ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदयात्रेदरम्यान नागरिकांना दिले.
शनिवारी सकाळी 7 वाजता अदालतवाडा, फरास चौक, जनार्दन जगदाळे घर, बालविकास ते आशिर्वाद बिल्डिंग, वाघाची नळी ते देवी चौक, कमानी हौद ते कूपर कारखाना, अॅड. कमलेश पिसाळ घर ते ढेंबरे घर, शिंदे गल्ली ते घोरपडे वखार, नगर पालिका कार्यालय ते चार भिंती या मार्गावर पदयात्रा होणार आहे. तसेच सायंकाळी 6 होलार समाज मंदीर, मंगळवार पेठ आणि रात्री 8 अरुण टेलर, पुणेकर घराजवळ कोपरा सभा होणार आहेत. पदयात्रेला व कोपरा सभांना सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगरविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.