मुंबई : राज्यातील खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. १० जून २०१६ ला या जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती परंतु लातूर आणि सोलापूर हे जिल्हे लागोपाठ महिलांसाठी आरक्षित झाल्याने महिला आरक्षणासाठी बदल करण्यासाठी १६ जिल्हा परिषदांसाठी नव्य़ाने सोडत काढण्याचे आदेश उच्च न्यायालाने दिले होते. त्यानुसार आज सोडत काढण्यात आली, त्यात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित करण्यात आले. सताऱ्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदांमध्ये कोल्हापूर, सांगली , सोलापूर, लातूर, अहमदनगर, जालना, चंद्रपूर हे जिल्हे आहेत.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित
RELATED ARTICLES