
महाबळेश्वर : धर्मवीर छ संभाजी महाराज वाहनतळाचे नाव बदलुन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्याचा पालिकेने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ महाबळेश्वर वासियांसह संभाजी प्रेमींनी पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला आज 100 टक्के प्रतिसाद मिळाला आज सकाळी श्रीराम मंदिरा शेजारील सभागृहात बैठकीत पालिकेचा निषेध करण्यात आला बैठकी नंतर पालिकेवर जोरदार मोर्चा काढण्यात आला तेथे मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन नामकरणाचा केलेला ठराव रद्द् करण्याची मागणी केली.
खा छ उदयनराजे भोसले यांनी येथील रे गार्डन वाहनतळास धर्मवीर छ संभाजी महाराज वाहनतळ असे नामकरण जाहीर केले होते तसा पालिकेने तेथे फलकही लावला होता दरम्यान सर्व साधारण सभेत पालिका धर्मवीर छ संभाजी महाराज वाहनतळ हे नाव बदलुन त्या ऐवजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ असे करण्याचा निर्णय घेणार असल्याने पालिकेने असा ठराव करू नये व वाहनतळाचे नाव बदलु नये या साठी शहरातील संभाजी प्रेमीं सभा चालु असताना तेथे पोहचले त्या ठिकाणी असलेल्या नगराध्यक्षा व नगरसेवकांना नागरीकांच्या वतीने नाव बदलु नये अशी विनंती करण्यात आली नागरीकांनी केलेली मागणी धुडकावुन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी बहुमताच्या जोरावर वाहनतळाचे धर्मवीर संभाजी महाराज हे नाव बदलुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ असे करण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव केला नागरीकांच्या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरात संभाजी महाराज प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली व त्यांनी पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्या नुसार त्यांनी आज महाबळेश्वर शहर बंदची हाक दिली होती त्या नुसार आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शहरात आज साधी टपरी देखिल उघडी नव्हती महात्मा गांधी मार्केट रे गार्डन मार्केेट सुभाष चौक बाजारपेठ भाजी मंडई छ शिवाजी महाराज चौक महात्मा फुले मार्केट पार्सनेज मार्केट वेण्णालेक येथे आज बींदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला
पालिकेने पाशवी बहुमताच्या जोरावर घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज येथील श्रीराम मंदीरात छ संभाजी महाराज प्रेमींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेलाही शहरातील नागरकांनी मोठी गर्दी केली होती या सभेसाठी आज वाई येथुन भीडे गुरूजी यांचे अनुयाची मोठया संख्येने हजर होते तसेच जिल्हयातील विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारीही उपस्थित होते या जाहीर सभेत अनेकांनी आपले जहाल विचार मांडले पालिकेने जरी नामंतराचा ठराव केला असला तरी नामांतर होवु दिले जाणार नाही जर फलकाला हात लावाल तर याद राखा अशा शब्दात वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर काही वक्त्यांनी नगरसेवकांचा शेलक्या शब्दात समाचार घेवुन नामकरणाच्या ठरावाच्या बाजुने कौल दिलेल्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा या सभेत जाहीर धिक्कार करून निषेध करण्यात आला तसेच पालिकेने हा ठराव रद्द् करावा अन्यथा आंदोलन अधिक तिव्र केले जाईल त्या नंतर जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास पालिकेचे लोकप्रतिनिधीच जबाबदार असतील असा जाहीर इशारा देण्यात आला या सभेत माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर पी डी पारठे शिवसेनेच्या जिल्हा परीषद सदस्या प्रणिता जंगम माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे माजी सभापती धोंडीराम बापु जाधव शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे माजी उपजिल्हा प्रमुख हरिभाउ संकपाळ माजी नगरसेवक संतोष शिंदे विशाल मोरे संतोष काळे व संदीप जायगुडे तालुका प्रमुख यशवंत घाडगे कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणिस अफजल बागवान शिवसेना शहर प्रमुख विजय नायडु पंचायत समिती सदस्य आनंदा उतेकर युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे लिलाताई शिंदे तालुका प्रमुख नितीन भिलारे विजय भिलारे शांताराम धनावडे गणेश उतेकर यांनी या जाहीर सभेत आपले परखड विचार व्यक्त केले व सर्वांनी एकमुखी पालिकेचा जाहीर निषेध केला या वेळी सभागृह गर्दीने खच्चुन भरले होते सभागृहात जागा नसल्याने लोक सभागृहा बाहेर उभे राहुन वक्त्यांची भाषणे स्पिकर वरून ऐकत होती सभेला शहरा बराबरच तालुक्यातुन सुमारे दोन हजारा पेक्षा अधिक लोक उपस्थित होते
सभेनंंतर सर्व संभाजी प्रेमी छ शिवाजी महाराज चौकात जमा झाली तेथे छ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तेथुन मोर्चाला प्रारंभ केला छ शिवाजी महाराज छ संभाजी महाराज यांच्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या बाजारपेठ मार्गे मोर्चा थेट नगरपालिकेवर गेला बंदाबस्तासाठी असलेल्या उपविभागिय पोलिस अधिकारी आर आर पाटील व पोलिस निरिक्षक राजंेंद्र राजमाने यांनी पालिकेच्या प्रेवशव्दारावा मोर्चा अडविला व केवळ शिष्टमंडळाला पालिकेत प्रेवश देण्यात आला शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात गेले पालिकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण सुरू आहे कामानिमित्त काढलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोठे आहे याची विचारणा शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी आशा राउत यांना केली या अनपेक्षित प्रश्नाने मुख्याधिकारी गोंधळुन गेल्या त्यांनी मुख्य लिपिम व अभियंता यांना बोलावले व अर्ध पुतळया बाबत विचारणा केली परंतु तेथे काणालाच ठामपणे काही सांगता आले नाही त्या मुळे मुख्याधिकारी यांच्या दालणात एकच गांेंधळ सुरू झाला पालिकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शिष्टमडळ संपापले होते जो वर पुतळा कोठे आहे याची माहीती मिळत नाही तो पर्यत आम्ही परत जाणार नाही अशी भुमिका मोर्चातील शिष्ट मंडळाने घेतली व तेथेच ठिया मारला मुख्याधिकारी यांनी या संदर्भात लेखी खुलासा दयावा अशी शिष्टमंडळाने मागणी केली शेवटी एक तासाच्या चर्चे नंतर मुख्याधिकारी आशा राउत यांनी शिष्ट मंडळाला पुतळा पालिकेत नाही व तो कोठे आहे याचा तातडीने शोध घेतला जाईल असे लेखी पत्र शिष्टमंडळाला दिले तेव्हा नामांतराचा ठराव रद्द् करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले व शिष्टमंडळ बाहेर पडले या वेळी नामांतराचा ठराव पालिका मागे घेत नाही तोवर महाबळेश्वर बंद राहील असे जाहीर करण्याात आले
छ संभाजी महाराज प्रेमींनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेवुन महाबळेश्वर येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता येथे कालपासुन उपविभागिय पोलिस अधिकारी आर आर पाटील यांनी तळ ठोकला आहे तसेच येथील पोलिस निरिक्षक राजेंद्र राजमाने यांच्या मदतीला तीन सहा पोलिस निरीक्षक व 150 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.