रंगारंग कार्यक्रमांनी होणार सांगता
सातारा ः पुणे-मुंबई मध्ये भरविल्या जाणार्या विविध वास्तू विषयक प्रदर्शनांच्या तोडीस तोड अशा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या रचना 2017 या बांधकाम विषयक प्रदर्शनला सातारकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद दिला आहे. रचना 2017 या प्रदर्शनामध्ये एकूण 97 स्टॉल्स् असून . यामध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपले नवीन प्रकल्प सादर केले आहेत. या बरोबच प्रदर्शनामध्ये बांधकामास उपयुक्त विविध मटेरियल्स् , बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष करून रेडिमिक्स काँक्रीट मोबाईल बॅचिंग प्लँट, काँक्रीट ब्लॉक मशिनरी, डोमेस्टीक लिफ्ट इत्यादी चा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील बिल्डर्सनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्ण व आधुनिक स्टॉल्स्ची उभारणी प्रदर्शनामध्ये केली आहे. यामध्ये मातोश्री लॅण्डमार्क, राजेंद्र चोरगे असोसिएटस्, कंग्राळकर असोसिएटस्, मंगलमूर्ती डेव्हलपर्स, श्री सद्गुरू डेव्हलपर्स, सागर प्रभाळे, आदर्श डेव्हलपर्स, प्लॅनेट फर्निचर, आर्या डेव्हलपर्स संस्थांचे स्टॉल्स प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले आहेत. याचबरोबर प्रदर्शनाचे प्रायोजक लक्ष्मी स्टील्स व एस एस कॉनमॅट यांचे स्टॉलही आकर्षण ठरत आहे. प्रदर्शन कालावधीत बुकींग करण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दरामध्ये सूट दिली असल्याने साताराकरांना व गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. सदर प्रदर्शनात घरकुलांची नोंदणी मोठया प्रमाणावर झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदर्शनाच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण जागेमध्ये सीसीटीव्ही कमॅरे बसविण्यात आल्यामुळे आयोजकांचे स्टॉलधारकांनी विशेष कौतुक होत आहे.
प्रदर्शनाचा सांगता समारंभ रविवार दि. 29 जानेवारी विविध कार्यक्रमांद्वारे होणार आहे. यावेळी वेल इंजिनीअर्ड बिल्डींग अॅवार्ड व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. तसेच प्रदर्शनातील उत्कृष्ठ स्टॉलला समारोप कार्यक्रमात विशेष बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी बीएआय चे नॅशनल प्रेसिडेंट अविनाश पाटील, बीएआय चेअरमन ऑफ कमिटी ऑन कार्पोरेट अफेअर्स श्रीराम कृष्णमूर्ती, वेस्ट झोनचे व्हाईस चेअरमन राजीव कृष्णानी, महाराष्ट्र स्टेट चेअरमन सुरेश पाटील, नॅशनल ट्रेझरर निरव परमार, नॅशनल ट्रस्टी विजय देवी उपस्थित राहणार आहेत. यावेळी रंगारंग कार्यक़्रम होणार असून फटाक्यांच्या आतषबाजीत रचना 2017 ची सांगता होणार आहे. रचना 2017 या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रदर्शन आयोजनाचे व निटनेटकेपणाचे कौतुक केले. यामध्ये साताराचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगर पालिकेचे बांधकाम सभापती किशोर शिंदे, पोलीस, विविध सरकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली व पहाणी केली.
रचना 2017 दि. 29 जानेवारी 2017 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांना विनामुल्य खुले आहे. रचना 2017 या प्रदर्शनाची सांगता आज रविवार दि. 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता विशेष आयोजित क्रमानंतर होत आहे.