सातारा : आगामी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वांनी आपआपसातील हेवेदावे बाजूला ठेवून एक दिलाने काम करावे, असे प्रतिपादन राजधानी सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
राधा-कृष्ण मंगल कार्यालय सोनगाव तर्फ सातारा येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळावा व सुवर्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक यांच्या सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि. प. उपाध्यक्ष सर्व साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, माजी उपसभापती व विद्यमान तसेच ही निवडणूक मनोमिलनाशिवाय स्वतंत्र लढविली जाणार आहे. उमेदवारी देताना कोणावरही अन्याय होणार नही, याची दक्षता घेतली जाईल.

पं. स. सदस्य सूर्यकांत पडवळ म्हणाले, आपण शेंद्रे गणात खा. उदयनराजे भोसले, तसेच जि. प. शेस फंड, पंचायत समितीमधील विशेष फंडातून कोटी रुपयांची विकास कामे साकारली. 1 कोटी 70 लाख रुपयांच्या खासदार फंडातील कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असून सुप्रिम उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रस्तावित कामांना थोडा ब्रेक मिळाला असला तरी लवकरच ही कामे पूर्ण होती. आपण नेव्हीमधील नोकरी पूर्ण केल्यानंतर गावी आल्यावर खा. उदयनराजे पं. स. सदस्य सूर्यकांत पडवळ (आप्पा), जि. प. सदस्य सौ. वनिता पोतेकर, संजय पोतेकर, अॅड. अंकुश जाधव, पांडुरंग नावडकर, आनंदराव हेळकर, शंकर कदम, माजी जि. प. सदस्य सुनिल सावंत, हिम्मत जाधव, शिवाजी कुंभार, मोहन जाधव, संतोष मुळीक, हणमंत जाधव, अशोक नावडकर, धनंजय जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा तालुक्यात सर्वांच्या सहकार्याने जि. प. व पं. स. निवडणूक लढविली जाणार असून तुम्हाला कोणाला या निवडणुकीच्या दरम्यान त्रास झालाच तर तो मला आवर्जुन सांगा. आपल्या भाषणात जि. प. उपाध्यक्ष रवी साळुंखे म्हणाले, गट व गणात जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामाला लागणे, व राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मला जलमंदिरमध्ये बोलवून प्रथम पं. समितीसाठी उमेदवारी दिली. उपसभापती पदावरही काम करण्याची संधी त्यांनी मला दिली. या संधीचे निश्चित स्वरुपात सोने करुन आपण विकास कामांचा डोंगर उभा करुन तो मार्गी लावला. माझ्या कामाची पोहच पावती म्हणून मला जि. प. शेंद्रे गटातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करीत आहे.
माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर म्हणाले, सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सातारा विकास आघाडीची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, मतदार संघातील लोकांचे प्रश्न चर्चा करुन सोडवावेत, रस्ते, पिण्याचे शाळा, समाजमंदिर, व्यायाम शाळा, यासाठी लागणारा निधी खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून मिळेल. या वेळची निवडणूक ही प्रतिष्ठेची असून मनोमिलनाशिवाय ते निवडणूक होत आहे. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावी, विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला भूलू नये.
मेळाव्यात सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत अॅड. अंकुश जाधव यांनी केले. मेळाव्यास शेंद्रे, पिलाणी, शेळकेवाडी, राकुसलेवडी, शहापूर, जकातवाडी, सांबरवाडी, साठेवाडी या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांबरवाडी ग्रा. पं. पदाधिकार्यांचा साविआमध्ये जाहीर प्रवेश
राधा-कृष्ण मंगल कार्यालय सोनगाव फाटा येथे आज झालेल्या मेळाव्यात सांबरवाडी, ग्रा. पं. पदाधिकारी रविंद्र जांभळे, विनोद भणंगे, प्रतिभा भणंगे यांच्यासह पाच जणांनी सातारा विकास आघाडीत खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.