साताराः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता संतोषकुमार याची नुकतीच निर्घुणपणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांनी हत्या केली. तसेच या गुंडांनी याच दिवशी आणखी एका स्वयंसेवकावर हल्ला केला. केरळ राज्यात मे 2016 पासून मार्क्सवादी सरकार आले. तेव्हापासून संघ स्वयंसेवक व हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्यावर हिंसक हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. केरळमधील मार्क्सवादी सरकारच्या इशार्यावरून मार्क्सवादी गुंडांकडून राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी लोकशाही आणि मानवता यांच्या विरूध्द होत असलेल्या हिंसेची आम्ही कठोर निंदा करीत आहोत. या हिंसक कारवार्या त्वरित थांबवाव्यात व या गुंडाविरूध्द कडक कायदेशीर कारवाई व्हावी तसेच या गुन्हयात योग्य शिक्षा व्हावी या मागणीसाठी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लोकशाही संवर्धन समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करून आक्रोश सभा घेण्यात आली. यावेळी शिर्डी संस्थानचे प्रताप भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा संघचालक, डॉ. दर्भे, अॅड. राजे भोसले, सारंग कोल्हापूरे, आयडीबीआयचे अनिल गोडबोले, सी.ए.क्षीरसागर, सरिता बलशेटवार, महेश शिवदे, सुरेंद्र बोरकर, भरत दामले, किशोर गोडबोले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकशाही संवर्धन समितीच्या वतीने सातार्यात आक्रोश सभा
RELATED ARTICLES