पाटण: तालुक्यातील जनता आता सुज्ञ झाली आहे 2014 साली केलेली चूक त्यांना लक्षात आल्यानेच त्यांनी या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमताने घवघवीत यश दिले आहे. येणा-या विधानसभेतही याचीच पुनरावृत्ती घडणार याची खात्री पटल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आाहे त्यामुळे निष्ठा, विकास आणि सामाजिक हित लक्षात घेता पुन्हा आमदारकी वाडयावर जाणार याची भिती वाटायला लागल्यानेच विरोधक शब्दांची आदळआपट करू लागले आहेत. त्यामुळे धनशक्तीची कॅसेट आता बंद करा आणि रस्ते अडविणारे कॉर्नरभाई, आरोपींना कोणत्या निकषावर उमेदवार्या देवून निष्ठावंतांना डावलले त्याचा जाहीर खुलासा करा असे आव्हान युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे केले.
याबाबत बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले आपल्या विरोधकांकडे कर्तृत्व नाही केवळ आपल्यावर आरोप करणे, बुध्दीभेद करणे, डोकी भडकावणे एवढाच त्यांचा एकमेव उद्योग, धनशक्ती आणि जनशक्तीचे तुणतुणे ते अजून किती वर्षे वाजवणार? अहो या तालुक्यातील जनशक्ती ही वर्षानुवर्षे विक्रमसिंह पाटणकर यांच्या सोबतच होती. यासाठी 1980 ते अगदी 2014 चा राजकीय इतिहास तपासून पहा याउलट 2004 आणि 2014 च्या निवडणूकीत तुम्हीच धनशक्तीचा वापर केला आपला घाम गाळून शेतात उस पिकविणा-या शेतकरी व कामगारांच्या धनावरच आपण निवडून आला अन्यथा मग इतर कारखान्यांच्या तुलनेत इथल्या शेतकरी, कामगारांच्या घामाचा पैसा नक्की कोठे गेला? हे पण एकदा जाहीर करून टाका. त्यामुळे आत्तापर्यंत भावनांना बळी पडणारी हिच जनता आता पुन्हा विकासात्मक प्रगतीची साथ देवू लागल्याने मग तुमच्या मनात पोटथूळ उठला आहे. पराभवाने खचून जाणारा मी कधीच नाही त्यामुळे तुम्ही माझी अजीबात काळजी करू नका याउलट तुमचे प्रताप जनतेच्या लक्षात आल्याने तुमचे पितळ उघडे पडले आहे. 2004 साली विजय दिन की पाच वर्षात तुम्ही काय केले? हे लक्षात येताच 2009 ला तुम्हाला याच जनतेने घरी बसवले. आता कदाचित तुमच्या कार्यपध्दतीत सुधारणा झाली असावी असा भाबडा आशावाद जनतेच्या मनात निर्माण झाला आणि पून्हा 2014 ला तुम्हाला आमदार केले. मात्र 2004 ला चूक तर 2014 ला घोडचूक केल्याचे लक्षात आल्यानेच या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत जनतेने तुम्हाला तुमची जागाा दाखविली. त्यामुळे तुमची भिती वाढणे व आमदारकी हातातून जाण्याची वस्तुस्थिती व भान तुम्हाला आले आहे. त्यामुळे आत्तापासूनच मग पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांना भावनिक करण्याचा तुमचा केविलवाणा उद्योगही सुरू झाला आहे. मात्र तुम्ही घाबरा मी अशांना अजिबात घाबरत नाही. कारण माझ्या कर्तृत्वावर व तालुक्यातील जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती नंतर आता थेट विधानसभेतही याच निकालाची पुनरावृत्ती होणार याची खात्री ही तुमच्याच भितीतून व्यक्तही होत आहे.
आमचे उमेदवार धनदांडगे आणि तुमचे कोण? याचाही लेखाजोखा तुम्ही जनतेसमोर मांडा, कारण रस्ते अडविणारे कॉर्नरभाई ज्यांच्यावर पोलीसात याच माध्यमातून गुन्हेदाखल आहेत अशांना उमेदवा-या दिल्या.मारूल हेवली, मंद्रुळ कोळे येथे निष्ठावंत, प्रामाणिक उमेदवार असतानाही मग येथेे कोणत्या निकषावर आपण उमेदवार्या दिल्या हे जाहीर करा? या प्रश्नांना का बगल देता? मुंबईतील शेठ आणि बिल्डरच्या जीवावरच तुम्ही काही ठिकाणी विजय मिळवला अन्यथा या काळगांव, नाटोशी, कुंभारगांव या ठिकाणीही सामान्य उमेदवार निवडून आलेच असते. त्यामुळे केवळ पराभवाच्या मानसिकतेमधुन धनशक्तीचे तुणतुणे तुम्ही बंद करा आणि जनतेचा कौल मान्य करा. हिम्मत असेल तर कागदावरचा नव्हे तर खरा विकास करा व रोजगार निर्मितीसाठी नवे प्रकल्प आणा, वर्षानुवर्षे सडणार्या साखर कारखान्यात शेतकरी, कामगारांना त्यांच्या घामाचा पैसा द्या आणि मग लढवू पूढची निवडणूक याच कतृत्वाच्या जोरावर जनता जनार्दन ठरवेल मग जनशक्ती कोणाकडे आणि धनशक्ती कोणाकडे? असेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी म्हटले आहे.
पाटण तालुक्यातील सुज्ञ जनतेने दिले राष्ट्रवादीला यशः सत्यजितसिंह पाटणकर
RELATED ARTICLES