सातारा : सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचे जाचक निकष बदलण्यात यावेत तसेच मुग, उडीद, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, कापूस इ. शेतमालांचे बाजारभाव शासनाच्या आयात निर्यात धोरणाव्दारे वाढवावेत या मागणीचे निवेदन सातारा जिल्हा संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
शेतमालाला मागील दहा वर्षातील सर्वात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्येत 13 टक्के वाढ झालेली आहे. शेतमालाची प्रामुख्याने कडधान्याची आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात दरवर्षी आयात वाढत आहे. यावर्षी कडधान्याची आयात 14 टक्के ने वाढलेली आहे. केंद्र व राज्य शासनाने निर्यात वाढविणे गरजेचे आहे. मागील 2 वर्षाआधी तुर, मुग, उडीद व कडधान्याचे बाजारभार 8 ते 10 हजार रुपये प्रती क्विंटल होतेे. परंतु सद्यस्थितीत मात्र या कडधान्याचे भाव 3 ते 4 हजार रुपये प्रती क्विंटल आहेत. बाजारभावांची अशीच अवस्था राहिल्यास शेतकरी आत्महत्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व विदारक परिस्थितीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील याची सरकारने नोंद घ्यावी.
शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास शासनाने बाजारभाव व हमीभावातील फरक शेतकर्यांना रोख रकमेच्या स्वरुपात द्यावा.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष रफिक शेख, मोहसीन शेख, प्रतिक शिंगरे, तोफिक शेख, सुरज सोडमिसे, चेतन चोरगे, विजय वनारसे, सोमनाथ यादव, ओंकार घोडके उपस्थित होते.
सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन
RELATED ARTICLES