घंटागाडीच्या नियोजनात कोणी किती लाटले ?
चेक वटवण्यासाठी पालिकेत सोयीचे कर्मचारी
सातारा : दहा महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी खाबूगिरीचे चांगलेच रंग दाखवायला सुरवात केली आहे पालिकेच्या उरावर तब्बल 55 कोटी रूपयांचे कर्ज असताना महसुलाला गळती लावण्याच्या उद्योगामुळे प्रशासन घाईला येऊ लागले आहे कंत्राटी अभियंत्यांना नगर अभियंता पदाची जवाबदारी देण्यापासून ठाण्याच्या ठेकेदार कंपनीला ठेका देण्यामध्ये पदाधिकार्यांमध्ये चक्क अधिकार्यांनी स्वारस्य दाखवल्याने नगरपालिका अधिनियम 1965 च्या अक्षरशः चिंध्या झाल्या आहेत . वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने घेतलेल्या कर्जाचे वार्षिक 1 कोटी 60 लाख रुपये व्याजाची काहीच चाड सत्ताधार्यांना वाटेनाशी झाली आहे सातार्यातील काही सतर्क मंडळीनी एकत्र येउन पालिकेत चालणार्या खाबूगिरीच्या विरोधात कायदेशीर मोर्चा उघडला आहे मात्र नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष राजू भोसले यांना प्रशासनाचा गाडा हाकण्याचा वकूब नसल्याची खाजगीत ओरड सुरु झाली आहे
दोन खाबूगिरीचा व्हायरस कोणाकोणाला ?
सातारा पालिकेत बर्याच जणांना खाबूगिरीचा की डा चावला आहे त्यामुळे त्यांचे . मआरोग्य म बिघडले असून सध्या सातार्यात काही जणांचा छापखाना तेजीत आहे अगदी ओढेनाले शौचालय सफाईपासून ते पालिकेचे भंगार स्वस्तात पळवण्यापर्यंतचे रंजक कारनामे विरोधकांच्या चर्चेचे विषय आहेत आता तर प्रशासनाच्या महादेवाला प्रसन्न करून मुंबईची घंटागाडी सातार्यात पळवण्याचा घाट घातला गेला आहे . स्थानिक भूमीपुत्रांना डावलण्याच्या उद्योगाच्या विरोधात तीव्र संतापाचे वातावरण आहे या प्रकरणातले लाभार्थी बडे मासे मोठा मलिदा गिळण्याच्या तयारीत असल्याची खद्खद कर्मचार्यांमध्ये आहे त्यामुळेच अनेक वादग्रस्त प्रकरणामध्ये अडचणीच्या ठरणार्या कर्मचार्यांच्या सोयीस्कर बदल्या करण्याचे सत्र प्रशासनाच्या महादेवाने ठेवले आहे . सभापतीशी खाजगीत मसलती करून ढेकर देणारे कारभारी आम्ही त्या गावचेच नाही असे सांगत आरोग्यच्या महत्वपूर्ण 14 फाईलीवर न पाहताच पटापटा सह्या करून गेले . लगोलग ठाण्याच्या साशा मॅनेजमेंटची घंटा वाजल्यानंतर काही जणांनी तृप्तीचा ढेकर दिला.
राजमातांची तळमळ आणि सैराटलेले अधिकारी
राजमाता श्री. छ. कल्पना राजे भोसले यांचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीत पालिकेच्या कारभारावर लक्ष असते कचराकुंड्या ओसंडून वाहणारी छायाचित्रे प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर राजमाता नी पायाला भिंगरी लावत प्रत्येक प्रभाग पिंजून काढायला सुरवात केली आहे . मात्र तो धाक नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा प्रशासनावर नसल्याने कर्मचारी सैराटलेत केबिनच्या बाहेर परस्पर काय राजकारण चालतं याची नगराध्यक्षांना कल्पनाच नसते . साविआतच दोन चार गट स्वतंत्रपणे काम करत असल्याने कोणाचा कोणाला धरबंद उरलेला नाही टोलाटोलीच्या राडयामुळे विरोधी गटाचे नगरसेवक पोलिसांच्या रडारवर आहेत . त्यामुळे बरेच वादग्रस्त विषय येत्या दोन तारखेच्या सभेत सत्ताधारी रेटून मंजूर करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना ही सभा गाजवण्याची जवाबदारी नामी संधी आहे.
55 कोटीच्या कर्जाची कुणाला चाड ?
सातारा पालिकेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडून पाणी पुरवठा योजनांसाठी यूडी 6 अंर्तगत गेल्या बारा वर्षात वेळोवेळी दिलेल्या कर्जाने आता 55 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे या थकबाकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आकडा सर्वात मोठा आहे या संदर्भात पालिकेला प्राधिकरणाने पाच स्मरण पत्र दिल्यानंतर आता प्रकरण कोर्टात पोहोचले आहे या कर्जापोटी पालिका वर्षाला दीड ते पावणेदोन कोटी रूपये व्याज मोजत आहे मात्र साविआच्या शिलेदारांना पालिकेची आर्थिक स्थिती रोडावली आहे याचे काही वैषम्य वाटत नाही ही मोठी खेदाची बाब आहे.