सातारा : सातारा पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये सर्वसाधारण सभेनंतर एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा लाजिरवाणा प्रकार घडला. सत्ताधारी सातारा विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर 25 विषयांची सभा गुंडाळल्याने नगर विकास आघाडी व भाजपाने लोकशाहीची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत सत्ताधार्यांचा निषेध केला. नवीआचे नगरसेवक शेखर मोरे यांना त्यांचे विषय मांडू देण्यास नगराध्यक्षांनी नकार दिल्याने एकच गोंधळाला सुणूवात झाली. सभेनंतर नविआचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणाचा नविआने निषेध करून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली भाजपच्या नगरसेवकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत व शिट्टी वाजवत सभागृहात प्रवेश केला.
नगरपालिकेच्या सभेत आज एक ते 25 विषय एका दमात मंजूर करत सत्ताधारी सदस्यांनी सभा गुंडाळली. राष्ट्रगितानंतर विरोधी नगर विकास आघाडीचे सदस्यांनी चर्चा व्हायला पाहिजे होती, अशी भुमिका घेतली. त्यावेळी सत्ताधारी सदस्य पुढे धावून आले व त्यांच्यात हमरीतुमरी सुरू असतानाच वसंत लेवेंनी अशोक मोनेंना धक्काबुक्की केली.
सातारा नगर पालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. सभेत सत्ताधारी सातारा विकास आघाडीने (खासदार उदयनराजे भोसले यांची आघाडी) विरोधकांची आक्रमक भुमिका लक्षात घेऊन एक ते 25 विषय एकाच दमात मंजूर करत दहा मिनिटात सभा गुंडाळली. राष्ट्रगितानंतर विरोधी नगर विकास आघाडी (आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आघाडी) च्या नगरसेवकांनी सभेत सर्व विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे होती, अशी भुमिका घेतली. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवक आक्रमक होत पुढे धावून आले. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवक वसंत लेवेंनी आक्रमक होत विरोधी आघाडीचे नगरसेवक अशोक मोनेंना धक्काबुक्की केली. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी इतर नगरसेवकांनी दोघांना ही बाजूला करत बाहेर घेऊन गेले. सत्ताधार्यांचे निषेध करत आमचे कोणतेच विषय चर्चेला घेत नसल्याचा निषेध करत भाजपच्या सदस्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून सभागृहाचे लक्ष वेधले.
काय घडले नाट्य?
नगर विकास आघाडीचे नगरसेवक शेखर मोरे यांनी मागील इतिवृत्ता समवेत काही विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करताच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्याला परवानगी नाकारली त्यामुळे शेखर गोरे यांनी संताप व्यक त केला तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही असे मोरे यांनी सुनावताच सावि आचे सर्व सदस्य उठून उभे राहिले आणि गोंधळाला सुरवात झाली. भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार अचानक आक्रमक झाल्या त्या म्हणाल्या प्रथम नागरिक म्हणून आम्ही तुमचा आदर करतो पण तुम्हाला आमचं म्हणणं ऐकून घ्यावच लागेल तुम्ही असा विषय थांबवू शकत नाही त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आक्रमकपणे समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार बंद झालेला माईक भाजपचे गटनेते धनंजय जांभळे यांनी सुरू करण्याचा प्रयत्नकेल्याने पुन्हा एकच गोंधळ झाला साविआच्या सदस्यांनी आक्रमक होत 25 विषय न वाचताच सर्व मंजूर असा नारा देत सभा गुंडाळली मात्र राष्ट्रगीताने तर विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी असली दादागिरी बंद करा असे सत्ताधार्यांना सुनावले त्यावरून आरोग्य सभापती वसंत लेवे आक्रमक झाले आणि उभयतांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही गटांकडून हस्तक्षेप झाल्याने पुढचा अनर्थ टळला मात्र पालिकेत घडलेल्या या धक्काबुक्कीची जोरदार चर्चा होती.
दोन सभेचा चेंडू आता जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात
सातारा विकास आघाडीच्या दंडेलशाहीचा अशोक मोने यांनी निषेध केला. ही सभा कलम 308 अंर्तगत रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचे मौने यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले . ते म्हणाले जनतेचा आवाज दाबून सत्ताधार्यांना स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत सावि आ आणि भाजप ने संगनमताने ही सभा उधळली. आरोग्यच्या टेंडरमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची कुंडलीच मांडणार होतो त्याला होणारा विरोध टाळण्यासाठीच ही सभा उधळण्यात आली साविआने सातार्याचा बिहार केला आहे नेत्यांप्रमाणेच साविआचे नगरसेवक दहशत माजवतात असा टोला मोने यांनी लगावला तसेच या धक्काबुक्कीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे मोने यांनी स्पष्ट केले.