सातारा : सातरा विकास आघाडीने तिकीट कापल्याने नाराज झालेले खा. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष नासीर शेख हे नगर विकास आघाडीकडे दाखल झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. प्रभाग क्र. 6 मधून नासीर यांच्यासह उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांच्या पत्नीला नगरविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्याने नकासपुरा व राजसपुरा या भागात रंगतदार परिस्थिती निर्माण झाली आहे. 40 दिवसाचे नगराध्यक्ष ठरलेले नासीर शेख यांनी वॉर्डात मोठी विकास कामे केल्याने त्यांच्याकडे एक गठ्ठा मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र साविआने अलीशेठ यांना उमेदवारी दिल्याने नासीरभाईंनी शुक्रवारी आमदारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली.