सातारा : निवडणुकीत कुठलाही एक नागरीक त्याच्या एका मतावर ठरवू शकत नाही. कोण जिंकणार आणि कोण हरणार, लोक ठरवतात, सातारची तमाम जनता ठरविणार की, त्यांना स्वत:चे निर्णय घेणारा नगराध्यक्ष पाहिजे कि, कटपुतली भावली पाहिजे हे जनता ठरवेल असे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. दरम्यान मराठा समाज महाराष्ट्रात एकवटला पण पालिका निवडणुकीत सातारचं राजघराणं दुभंगलं ही दुर्दैवाची बाब आहे. खासदारांनी आमच्या थोरल्या वहिनीसाहेबांना उमेदवारी दिली असतीतर आम्ही उमेदवारच उभा केला नसता असा टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.

मनोमिलनाला मला प्रतिसाद का मिळाला नाही. अध्यक्ष पदावरून का चार दोन नगरसेवकांवरून हे सगळं घडलं हा विषय चर्चेला आला नाही. अदालत वाडयामध्ये एकदाच मनोमिलनासंदर्भात दहा मिनीटांची बैठक झाली. त्यामध्ये काहीच चर्चा झाली नाही. असे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा समाज क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकवटला मात्र पालिका निवडणूकीत सातार्याच्यां राजघराण्यात फूट पडून ते दुभंगलं. निवडणूका होतील कोण विजयी होईल कोण हारेल. हा विषय नंतरचा आहे. मराठा समाज महाराष्ट्रात एकवटला पण सातारचं राजघराणं दुभंगलं ही दुर्दैवाची बाब आहे.
कास तलावाच्या उंची वाढवण्याच्या प्रश्नावर बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना कासच्या उंचीसाठी 42 कोटी मंजूर करून घेतली. त्याला वनविभागासह सर्व विभागाच्या मंजुर्या मिळाल्या आहेत. सातारा शहरातील रस्त्यांची कामे ही तत्कालीन राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीत मिळालेल्या अनुदानातून झाले आहे. त्यावेळी रस्त्यांच्या कामासाठी आमदार म्हणून निधीसाठी पाठपुरावा केला होता. झालेल्या रस्त्यांच्या कामात आपले योगदान आहे. शहरात ज्या घरकुल योजना झाल्या त्या पालिका, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्या आहेत. एकट्या केंद्राच्या योजनेतून झालेले नाहीत. आमदार म्हणून मी अनेक योजना आणल्या आहेत. भविष्यकाळात विकासाच्या योजनांसाठी आपला पाठपुरावा राहिल. 22 महिने तुमच्यामुळे तुरुंगात जावे लागलं असा खा. उदयनराजे यांनी आरोप केला आहे. यावर आ. शिंवेंद्रराजे म्हणाले, मनोमिलनाची पहिली बैठक झाली त्या बैठकीत मागचे विषय काढायचे नाहीत ते विसराचे ते विषय विसरून मनोमिलन केले. भाऊसाहेब महाराज असताना लेवे खून घटना घडली. खा. उदयनराजे सांगावे हा विषय माझ्या डोक्यात आहे. आम्ही त्यांच्या खासदारकीला, जिल्हा बँकेच्या निवडणूकीत मदत केली चालते. तसेच मार्केट कमिटी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघात तुमच्या लोकांना सांमावून घेतले, का तर मनोमिलन होतं म्हणून. टाळी एका हाताने वाजत नाही. काही चुका कौटंबिक अथवा अन्य असतील ते सांगू शकत नाही. हे जुने विषय विसरून दोन्ही मुलांनी एकत्र यायचं यावर मनोमिलन झालं होतं. शेवटपर्यंत मनोमिलनासाठी कटिबध्द राहिलं. जिल्हा बँकेत त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार उभे केले व मागे घेतले तितपासून त्यांच्या मनात माझ्या विषयी कटूता निर्माण झाली असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनोमिलनाचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करता येईल तेवढे केलं आहे.
नव्या जुन्या उमेदवारांना संधी देवून नगर विकास आघाडी 40 जागा लढवित आहेत. सातारकरांच्या आग्रहास्तव वेदांतिकाराजे भोसले यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. माझा एकट्याचा निर्णय नाही. एखादी महिला जर कर्तुत्वान असली तर तीला अध्यक्षपदाची उमेदवारी देणे चुकीचे नाही. आज सातारा शहराचा अमृत्व महोत्सवी योजनेत समावेश झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. पालिकेला शिस्त लागेल. येणार्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या पाहिजेत. योजना आल्या तरी त्याची अमंलबजाणी करता आली पाहीजे. याचा विचार करून वेदांतिकारांजेना उमेदवारी दिली आहे. खासदारांनी आमच्या थोरल्या वहिनीसाहेबांना उमेदवारी दिली असतीतर आम्ही उमेदवारच उभा केला नसता असा टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या सातारा एमआयडीसीला व सातारा शहराला 6 कोटी युनिटस वीज अजिंक्यतारा कारखान्यातून पुरवठा केला जातो. 6 कोटी वीज युनिट पुरविणे हा मोठा प्रकल्प आहे. याची आम्ही बाकींच्या सारखी या प्रकल्पाची जाहिरात बाजी केली नाही. अजिंक्यतारा कारखान्याकडून 6 कोटी युनिटस वीज येते की, नाही याची माहिती महावितरण कार्यालयातून घेऊ शकता, असे सांगून त्या म्हणाल्या बीव्हीजी ग्रुप बरोबर फुडपार्क हो आहे. त्या फूडपार्कला आ. शिवेंद्रराजे यांनी आमदार निधीतून पूर्ण सहकार्य केला आहे. रस्ता मिळत नव्हता तो रस्ता त्यांनी केला आहे. मनोमिलन आहे पण तत्वाशी नाही. नगराध्यक्ष पदाला मतदान झाले नाही तर अनर्थ होईल. खासदारकीचा राजीनामा देईन असे वक्तव्य खा. उदयनराजे यांनी केले आहे. याला उत्तर देताना वेदांतिकाराजे म्हणाल्या, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यावर वेदांतिकाराजे म्हणाल्या, अध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार या पाच वर्षे पालिकेत नरगरसेविका होत्या. भ्रष्टाचार झाला होता तर मग गप्प का बसला. अशा उमेदवार पुढच्या पाच वर्षात काय बोलणार असा टोलाही त्यांनी सुवर्णा पाटील यांचे नाव न घेता लगावला.