Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडी40-0 च्या इतिहासाने विरोधकांना अद्दल घडवा : खा.उदयनराजे भोसले यांचे मतदारांना आवाहन

40-0 च्या इतिहासाने विरोधकांना अद्दल घडवा : खा.उदयनराजे भोसले यांचे मतदारांना आवाहन

सातारा :  सातारच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रभाग क्रं. 8 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी स्थानिक नागरिकांना केले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवी कदम व प्रभाग क्र. 8 मधील साविआचे उमेदवार वसंतशेठ जोशी, व महिला उमेदवार हुमेरा बागवान उपस्थित होते. पुढे बोलताना खा.उदयनराजे भोसले म्हणाले की, सातारा शहरात अनेक विकास कामे आम्ही केली आहेत.
विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता सातारकर जनतेने साविआच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. शहराचा विकास खर्‍या अर्थाने करावयाचा असेल तर साविआच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यावे. तसेच नगर पालिकेत 40-0 असा इतिहास घडवून विरोधकांना अद्दल घडवावी. तसेच सर्व सामान्य घरातून आलेल्या सौ माधवी कदम यांना नगराध्यक्षपदी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी बहुसंख्येने प्रभाग 8 मधील नागरिक उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular