सातारा पंचायत समितीत शेंद्रे गण प्रथमच नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव
सातारा, दि.5(प्रतिनिधी)- सातारा तालुका पंचायत समितीसाठी 2017 मध्ये होणा-या निवडणुकीसाठीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी शाहूकलामंदिर येथे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती देशमुख-पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. 20 गणांपैकी 10 गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. यात शेंद्रे हा गण नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी कधीच आरक्षित न झाल्याने तो आरक्षित करण्यात आला. उर्वरित आरक्षण चिठ्टीव्दारे काढण्यात आले.
सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट वाढल्याने दहा गट झाले होते त्यामुळे पंचायत समितीसाठी 20 गण झाले होते. शासनाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने दहा गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. पूर्वी जे गण अनुसूचित जातीसाठी राखीव होते ते वगळून लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांकानुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात शिवथर आणि तासगाव हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. त्यापैकी तासगाव हे अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण असल्याने 5 जागा आरक्षित करण्यात आल्या. पाचपैकी 3 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यात शेंद्रे हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी कधीच आरक्षित न झाल्याने तो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आला. त्यानंतर संभाजीनगर(कोडोली) आणि नागठाणे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर खेड आणि दरे खुर्द गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला. 20 जागांपैकी सात जागा आरक्षित झाल्याने 13 जागा सर्वसाधारणासाठी राहिल्या. सात प्रवर्ग पैकी चार जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारणमधील 6 जागा महिलांसाठी आरक्षण काढण्यात आल्या. त्यात अतित, वर्णे, किडगाव, अंबवडे बुद्रुक, वनवासवाडी, शाहुपुरी-कोंडवे हे गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले तर सर्वसाधारणसाठी कोडोली, पाटखळ, शाहुपुरी, अपशिंगे, कारी, लिंब, गोडोली हे आरक्षित झाले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि पारदर्शकपणे आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी गणनिहाय नकाशे लावण्यात आले होते. त्याबाबत हरकत घेण्यासाठी दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर मुदत आहे.
अं.नं. गणाचे नाव आरक्षण
1 शिवथर अनुसूचित जाती
2 पाटखळ सर्वसाधारण
3 लिंब सर्वसाधारण
4 किडगाव सर्वसाधारण स्त्री
5 शाहुपुरी कोंडवे सर्वसाधारण स्त्री
6 शाहुपुरी सर्वसाधारण
7. खेड नागरिकांचा मागास प्रवर्ग
8 गोडोली सर्वसाधारण
9 वनवासवाडी सर्वसाधारण स्त्री
10 तासगाव अनुसूचित जाती स्त्री
11 कोडोली सर्वसाधारण
12 संभाजीनगर नागरिकांचा मागास स्त्री
13 दरे खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग
14 शेंद्रे नागिरकांचा मागास प्रवर्ग स्त्री
15 अंबवडे बुद्रुक सर्वसाधारण स्त्री
16 कारी सर्वसाधारण
17 नागठाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
18 अतित सर्वसाधारण स्त्री
19 वर्णे सर्वसाधारण स्त्री
20 अपशिंगे सर्वसाधारण