सातारा : मराठा क्रांती मूक मोर्चा सातारा येथे सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. हा मोर्चा योग्य नियोजन व केलेल्या सहकार्याबद्दल सातारा जिल्हा संयोजन समितीच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सातारा येथे मराठा क्रांती मूक मोर्चा सुरळीत पार पाडताना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हा संयोजन समिती पदाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली होती. याशिवाय मोर्चात वाढणारा जनसागर यांची सुरक्षितता, वाहनांचे पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही उत्तम प्रकारे जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली होती. यामुळे मराठा क्रांती मोर्चाला सुमारे 50 लाख लोकांचा सहभाग झाला. न भूतो न भविष्यती असाच मोर्चा अत्यंत शांततेत व दिलेल्या आचार संहितेप्रमाणे पार पडला. यामध्ये संयोजन तसेच स्वयसेवक, प्रसार माध्यमे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. एकूणच मोर्चा यशस्वी पार पडण्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे धन्यवाद मानण्यात आले आहेत.