सातारा : नागपूर उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणार्या बसेसची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी मागील वर्षाप्रमाणेच करण्याचे सूचित केले आहे. जरी वाहनांचे मोटार वाहन कायदा कलम 56 अंतर्गत जारी केलेल्या योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही स्कूल बसला ही चाचणी करून घेणे बंधकारक आहे .याची नोंद शाळेच्या मालकीची वाहने असलेल्या वाहने असलेल्या वाहन धारकांनी व करारावरील वाहने असलेल्या वाहन धारकांनी घेवून आपल्या वाहनांची तपासणी करण्यासाठी दिनांक 23 जून 2017 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पूर्वी वाहन तपासणी करुन प्रमाणपत्र प्राप्त न करणार्या स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही या कार्यालयाकडून करण्यात येईल याची सर्व संबंधित वाहतुकदार , शिक्षण संस्था, व्यवस्थापन व पालकांनी नोंद घ्याव . ही तपासणी पूर्णत: नि: शुल्क राहिल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी कळविले आहे.
स्कूल बसची तपासणी करण्यासाठी मुदतवाढ
RELATED ARTICLES