सातारा : परमपुज्य श्री सेवागिरी महाराज यात्रा कालावधीत भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी दिल्या.
परमपुज्य श्री सेवागिरी महाराज यात्रा व रथोत्सव, पुसेगांव दि. 12 व22 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये भरणार असून, यात्रेचा मुख्य दिवस दि. 17 डिसेंबर 2017 आहे. रथोत्सवादिवशी जवळपास आठ ते दाह लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना याचा आढावा घेणेसाठी 8 डिसेंबर 2017 रोजी सेवागिरी महाराज मंदिर, पुसेगाव येथे बैठक घेणेत आली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गायकवाड बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार, सुशीलकुमार बेल्हेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख देविदास ताम्हाणे यांच्यासह सर्व जिल्हा स्तरीय विभाग प्रमुख, पविभागाचे विभाग प्रमुख, तालुका स्तरीय विभाग प्रमुख तसेच सेवागिरी महाराज ट्रस्ट पुसेगावचे अध्यक्ष व विश्वस्त, ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीस सरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत पुसेगाव, म.रा.वि.वि. मंडळ, सार्वजनिक बांधकाम,रा.प. महामंडळ, कृषी विभाग, आरोग्य विभाग,लघुपाटबंधारे विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पोलीस स्टेशन, देवस्थान ट्रस्ट, शैक्षणिक संस्था विभागांच्या कामाचा आढावा घेणेत आला. सर्व विभागांनी यात्रेच्या अनुषंगाने परिपूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पुसेगावकडे येणा-या सर्व रस्तांचे खड्डे बुजविणेत आले असून, साईडपट्टया भरुन घेतलेल्या आहेत. यात्रा काळात भाविकांच्या सोईसाठी पाण्याची सोय व शौचालयाची सोय केलेली आहे. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व रोगराई पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने आवश्यती ती जंतुनाशके फवारणी केली आहे. यात्रा सुरळीत व शांततेमध्ये पार पाडणेसाठी सर्व विभांगानी तयारी केलेली असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
सर्व विभागांनी एकत्रित काम करुन यात्रा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी साहेब श्री. साहेबराव गायकवाड यांनी शेवटी केले.