सातारा : सातारा- जावली मतदारसंघात डांबरी रस्त्यांचे जाळे विणून विकासाला चालना देणार्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्त्यांचे रुंदीरकरण आणि मजबुतीकरणाचाही धडाका सुरु केला आहे. शाहुपूरी चौक ते जुना मेढा रस्ता या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 75 लाख, राज्यमार्ग 140 महानुभव मठ, तामजाईनगर ते सैदापूर (कॅनॉल) या रस्त्यासाठी 30 लाखाचा भरीव निधी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे. तसेच सातारा तालुक्यातील अंबवडे बु. ते लावंघर- अनावळे आणि शेंद्रे- वेचले, डोळेगाव ते भाटमरळी या दोन रस्त्यांच्या कामांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजूरी मिळाली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा आणि शाहूपूरीकरांसाठी महत्वाचा असलेल्या शाहुपूरी चौक ते जुना मेढा रस्ता या रस्त्याचे अडीच किलोमीटरपर्यंतचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी आ. शिवेंद्रसंहराजे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने 75 लाख रुपयांची तरतूद केली आहे. राज्य मार्ग 140 ते महानुभव मठ, तामजाईनगर ते सैदापूर (कॅनाल जवळ) या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे दोन्ही रस्ते शहरवासियांसाठी आणि उपनगरातील रहिवाश्यांसाठी अतीशय महत्वाचे आणि दळणवळणासाठी उपयोगी असल्याने या दोन्ही रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष प्रयत्न करुन ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरण योजनेंतर्गत (3054) निधी उपलब्ध करुन दिला आहे. या दोन्ही रस्त्याची कामे तातडीने सुरु करुन काम दर्जेदार करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकार्यांना केल्या आहेत.
इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण या योजनेतून सातारा तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. इजिमा 60 ते अंबवडे बु., करंजे, शिंदेवाडी, लावंघर ते अनावळे या सुमारे सहा किलोमीटर रस्त्याच्या (इजिमा 57) मजबुतीकरणासाठी 30 लाख रुपये तर, शेंद्रे, वेचले, डोळेगाव ते भाटमरळी (इजिमा 53) या 9 किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 40 लाख रुपये निधी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. प्रशासकीय बाबींची पुर्तता करुन तातडीने या दोन्ही रस्त्यांच्या कामाला प्रारंभ करुन सदर ग्रामीण भागातील लोकांची दळणवळणाची गैरसोय तातडीने दूर करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या आहेत.