वडूज : खटाव-माण तालुक्यातील रब्बी पिकासाठी 15 डिसेंबर नंतर उरमोडी कालव्यातून पाणी दिले जाईल असे आश्वासन पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी कार्यकत्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच हिंगणे येथील प्रमुख कार्यकत्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटले. यावेळी या कार्यकत्यांनी सद्याची खटाव तालुक्यातील परस्थिती तसेच पाण्याच्या नितांत गरजेबद्दल सविस्तर चर्चा केली. सातारा येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री आले असताना ही चर्चा करण्यात आली. सरपंच किशोर ढोले, विजय काळे, किसन पाटोळे, विकास कुदळे, विक्रम पडवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खटाव-माणमध्ये 15 डिसेंबर नंतर उरमोडीचे पाणी : शिवतारे
RELATED ARTICLES