Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजलमंदिरमध्ये खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत उद्या कार्यकर्त्यांची बैठक

जलमंदिरमध्ये खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत उद्या कार्यकर्त्यांची बैठक

सातारा : आगामी होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय ध्येय धोरण ठरविण्यासाठी सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिरमध्ये विशेष कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे.
सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीने वर्चस्त मिळविल्यानंतर निवडक कार्यकर्त्यांची बैठक जलमंदिरमध्ये बोलविलेली आहे. नविआचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व खा.श्री.छ उदयनराजे भोसले यांचे गेल्या  10 वर्षातील मनोमिलन सातारा पालिका निवडणूकीच्या वेळी तुटल्याने स्वतंत्र आघाडी टाकून निवडणूक लढविण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. माधवी कदम या निवडून आल्यामुळे साविआमध्ये कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले आहेत. सातारा तालुक्यात जि.प. व पंचायत समिती निवडणूक मनोमिलन तुटल्यानंतर स्वतंत्र लढवायची का? याबाबत या बैठकीत रणनिती ठरविली जाणार आहे. यामुळे जलमंदिरमध्ये  या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सातारा तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular