सातारा : येथील कुबेर गणपती मंदिर, सदरबझार येथे परराज्यातील दोन युवकांकडून एक पिस्टल, दोन गावठी कट्टे व 13 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 89 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल एलसीबी पथकाकडून हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
कुबेर गणपती मंदिर परिसरात सडपातळ दोघा युवकांकडून बेकायदेशीर शस्त्रे विक्री करण्यात येणार असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने सापळा रचून रामविलास घुरहू यादव (वय 30रा. सितापट्टी ता.जि. गाजीपूर उत्तर प्रदेश) हरिशंकर रजई यादव (वय 35 रा. आरीपहाडपूर ता.जि. गाजीपूर उत्तर प्रदेश ) या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन गावठी कट्टे व 13 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 89 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन इसम बेकायदा शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक सागर गवसणे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उप निरीक्षक सागर गवसणे गजानन मोरे, स. फौ. विलास नागे, पृथ्वीराज घोरपडे, पोलीस हवालदार संजय पवार, दिपक मोरे, ज्योतीराम बर्गे, पो. ना. नितीन भोसले, योगेश पोळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कडव, संतोष जाधव संजय वाघ यांनी सहभाग घेतला होता. याबाबत सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.