सातारा : छत्रपतींच्या घराण्याला मोठा पारंपारिक वारसा आहे. तो वारसा जपण्याची जबाबदारी मोठी आहे आणि ती मी निष्ठेने पार पाडत आहे. मात्र आपण राजघराण्यात जन्माला आलो आहोत हे भान आ. शिवेंद्रराजे यांचे सुटले आहे. दुसर्यावर टीका करायला फारशी अक्कल लागत नाही. दहशतवाद आणि खंडणी यासारखे आरोप करायचे असतील तर समोर येवून जाब विचारण्याची हिम्मत ठेवा. मग उदयनराजे काय? मग ते तुम्हाला दाखवतो. आता मनोमिलन त्यातलं फिक्सिंग सगळं काही विसरा, सत्तेचे विकेंद्रीकरण काय? हे तुम्हाला आता समजेल. आदरणीय आमदारांच्या कारकिर्दीची ही शेवटची तीन वर्षे या पुढचा आमदार स्वत: उदयनराजे निवडून देतील आणि तो आमदार सर्वसामान्यांचा असेल. नको आता घराणेशाही. सातार्याचा विकास आणि तत्वाशी बांधिलकी हे उदयनराजेंचे तत्व आहे. मग भाऊ असला तरी त्याला माफी नाही अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्यावरील आरोपाचा घणाघाती शब्दात समाचार घेतला. येथील हॉटेल महाराजामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, इंम्फोसिस, कूपर, मुथा, डी मार्ट आदी उद्योगपतींना कोणी आणि किती खंडणी मागीतली ते जाहिर करु का अशी गोपनीय धमकी देण्याऐवजी, प्रत्यक्ष तुमच्याकडची माहीती जाहिर कराच, कर नाही त्याला डर कशाला1 असा सवाल करत, कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे, परंतु ती चुक आम्ही दुरुस्त करतो, एकवेळ संधी द्या, नाहीतर तुम्हाला योग्य वाटेल ते करा अशा शब्दात तुम्ही तत्कालीन दिलेली कबुली तुम्ही लवकर विसरला असाल, दहा वर्षात आम्ही का बोललो नाही हे तुम्हाला आता लक्षात आले असेल. कारखान्यातील झालेल्या भ्रष्टाचाराचे संपूर्ण प्रकरण, निवडणुक संपल्यावर पुन्हा आम्ही धसास लावणार आहे, त्यानिमित्ताने तुुुुुुुुुुुुुुमच्या समंजस चेहर्याचा बुरखा फाटला जाईलच परंतु तुमची भ्रष्ट आणि विद्रृप प्रवृत्ती गा्रमिण भागातील सामान्य जनतेलाही दिसून येईल. सुरुवात तुम्ही केलीच आहे तर एकदा दूध का दूध आणि पानी का पानी होवूनच जावूदे असे प्रति आव्हान सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आणि खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नांव न घेता दिले.
सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.माधवी कदम आणि साविआचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचार बैठकीत नागरीकांशी चर्चा करताना, खा. उदयनराजे भोसले बोलत होते.
सुमारे 1978 सालापासून, तुमच्या व्यक्तीगत घरात अनिर्बंध सत्तास्थाने होती, स्व.अभयसिंहराजे भोसले हे सलग 17-18 वर्षापेक्षा जास्त काळ राज्यमंत्री ,मंत्री, पालकमंत्री आदी मंत्रीपदावर होते, औद्योगिक वसाहतीमध्ये एल अॅन्ड टी, डॉ.बेग या सारख्या कंपन्या येत होत्या, डॉ.बेग कंपनीने कंपौन्ड घालुन, काही मशिनरी सुध्दा आणली होती, परंतु या कंपन्या एका रात्रीत दुसर्या ठिकाणी गेल्या. त्यावेळीही स्व.अभयसिंहराजे भोसले यांनी खंडणी सारखे प्रकार केले असावेत, तथापि त्यांच्या नाकर्तेपणामुळेच या कंपन्या सातार्यात येवून सुध्दा पुन्हा बाहेर गेल्या हे सत्य आहे.
एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या आल्या पाहीजेत, त्या टिकल्या पाहीजेत आणि कामगार वर्गही जगला पाहीजे, नागरीकांचे सार्वजनिक आरोग्य राखले गेले पाहीजे, अशी आमची संतूलीत भुमिका आजही कायम आहे. त्याकरीता एमआयडीसी अधिकार्यांच्या, मास संघटना यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या आहेत. एमआयडीसीतील मोकळे प्लॉट तसेच एमआयडीसीमधुन निघुन गेलेल्या कंपन्यांचे शेडसह असलेले प्लॉट ताब्यात घेवून, ते सामान्य होतकरु आणि उत्सुक व्यावसायिक व्यक्तींना द्यावेत, त्यांनी त्याठिकाणी उद्योग उभारावेत ज्या योगे रोजगाराबरोबरच आर्थिक उलाढाल वाढेल असे नियोजन आहे, सरकारी नियम, त्या नियमास असलेल्या पळवाटा, यातुन समन्वय साधुन एक चांगला पायंडा पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे,
चौपाटीवरील तसेच अन्य ठिकाणच्या छोटया मोठया व्यावसायिकांना खंडणीखोरांचा कमी जास्त त्रास होत असतो ही वस्तुस्थिती आहे, तो फक्त सातार्यातच आहे असा भाग नाही, परंतु अश्या खंडणीखोरांना अनेकदा असे व्यावसायिकच पाठीशी घालतात,किरकोळ प्रकार असल्याने, पोलिस यंत्रणेवरील अन्य ताण लक्षात घेता त्यांच्या कडूनही काही प्रमाणात दुर्लक्ष होत असेल. अशा खंडणीखोरांवर आमचा वरदहस्त कधीच नव्हता व राहणारही नाही उलट त्यांचा बंदोबस्त आम्हीच वेळोवेळी केला आहे. काही खंडणीखोरांना कोणाच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अभय दिले हे स्वतः स्वतःला विचारा म्हणजे ते कुणाचे कोण आहेत हे तुम्हाला समजुन येईल.
पुन्हा एकदा सांगतो, एमआयडीसी उद्योजकांना कोण,किती खंडणी मागतो हे सांगु का असे तुम्ही बोललाच आहात तर आता गप्प बसु नका, तुम्ही पुराव्यासह जाहिर केले नाही तर, तुमची दातखिळ बसली असा समज जनतेमध्ये पसरेल, यापूर्वीपासून आणि आजसुध्दा तुम्हाला काही आवाज नाही समज आहेच त्याच आणखी भर पडेल म्हणून तुम्ही ते जाहिर कराच..
दि. 19 नोव्हेबरला 2016 रोजी डिसीसीबॅन्क सभागृहात सायं.6 वांजता, सातारकरांच्या मनातल्या प्रश्नांना, बेधडक उदयनराजेंची बेधडक उत्तरे या कार्यक्रमात, आम्ही नागरीकांच्या प्रश्नांना जाहीर उत्तरे देणार आहोत, त्याठिकाणीसुध्दा पाहीजे तर तुम्ही या आणि आम्हाला काहीही विचारा, त्याची बेधडक उत्तरे आम्ही जाहिरपणे देवू, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगीतले.