मेढा: जावली तालुक्यातील जवळवाडी गावचा सुपुत्र अजिंक्य अशोक जवळ- पाटील हा विद्यार्थी वाशी येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात एस.वाय बी.कॉम ला शिक्षण घेत असून त्याने एन.सी.सी. परेडचे उत्कृष्ठ नेतृत्व केल्याबद्दल त्याला सुवर्ण पदक देवून मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले आहे.
जावळी तालुका हा शुरांचा वीरांचा आहे. देशासाठी लढताना वीर तुकाराम ओंबळे,नवनाथ सुर्वे, शशिकांत मोरे, रविंद्र धनावडे, सुरज मोहिते यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पण याच तालुक्यातील अनेक युवक देशसेवेसाठी जाण्यासाठी आजही प्रयत्नशिल आहेत. कारण इथल्या तरूणाच्या नसानसात देशसेवेचे व्रत भिनले आहे.
हेच व्रत घेवून प्राथमिक शाळा जवळवाडी येथे शालेय शिक्षण घेणारा विद्यार्थी आज वाशी येथिल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. या शिक्षणा दरम्यानच एन.सी.सी मधे सहभागी होवून व्यायाम,उंची आणि पहाडी आवाज यामुळे त्याने एन.सी.सी.चा बेस्ट कॅन्डेड म्हणून बहूमान मिळविला आहे. 19 डिसेंबर रोजी या महाविद्यालयाच्या वतीने एन.सी.सी. दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी वाशी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला तानाजी पाटील, सुरेशबुवा जवळ, अशोक जवळ, मनिषा जवळ उपस्थित होते. अजिंक्यच्या यशाबद्दल विलासबाबा जवळ, जवळवाडी ग्रामपंचायत सरपंच वर्षा जवळ, उपसरपंच शंकर जवळ, मंडळाचे अध्यक्ष श्री सदाशिव जवळ यांनी अभिनंदन केले आहे.
जवळवाडीच्या अजिंक्य पाटीलने केले एन.सी.सी परेडचे मुंबईत नेतृत्व
RELATED ARTICLES