म्हसवड : येथील शंभू महादेव हायस्कूल वरकुटेच्या 14 व 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघांची जिल्हापातळीसाठी निवड झाली आहे. लोधवडे माध्यामिक विद्यालयात माण तालुका शालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये माण तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता.
शंभू महादेव हायस्कूल वरकुटेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आले तर गणेश विद्यालय नरवणेचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघात श्रावणी माने, साक्षी दोलताडे, पल्लवी साठे, प्रतिक्षा माने, दोलताडे, रुपाली बनगर, सानिया माने, प्राप्ती माने, लतिका चव्हाण, गायत्री यादव, सविता शेंबडे, वैष्णवी सावंत यांचा समावेश होता.
17 वर्षाखालील संघामध्ये प्रज्ञा बाबर, दिशा माने, श्रूती शिंदे, सोनाली दोलताडे, संचिता माने, अंकीता जाधव, सुरेखा कदम, वैष्णवी साठे, हर्षदा जाधव, शिवानी माने, ज्ञानेश्वरी करडे, पायल धोत्रे यांचा समावेश होता.
या खेळाडूंना भगवान दोलताडे व शिवाजी माने, शरद जाधव मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील, बाळासाहेब माने, उपविभागीय अधिकारी, अंकुश इंगळे, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, अनेक ग्रामस्थ सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शंभू महादेव हायस्कूलच्या मुलींच्या दोन कबड्डी संघांची जिल्हापातळीसाठी निवड
RELATED ARTICLES