वार्ताहर
परळी
सज्जनगड चा दास नवमी महोत्सव यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने या वर्षी भाविकांची मांदियाळी नाहीच! भक्ता विनाच दासनवमी उत्सव साजरा झाला. ग्रामपंचायत परळी, रामदास स्वामी संस्थान तसेच समर्थ सेवा मंडळ यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत धार्मिक विधी पार पाडले. गडावर स्थानिक तसेच मानकरी यांना प्रवेश देण्यात आला होता. परगावाहून येणाऱ्या काठी पालकी या तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे महंत मठपती सेवेकरी समर्थभक्त यात्रेकरुंना गेल्या नऊ दिवसांपासून प्रवेश बंदी होती.
सज्जनगड ठोसेघर फाट्यावरच पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. येथून वरती वाहने तसेच पायी जाणार्या भाविकांना आढवण्याकरिता बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी पहाटे तीन वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली या नंतर समर्थ रामदास स्वामी यांनी पूजन केलेल्या श्री रामपंचायतन, व श्री समर्थ समाधीचे महा पूजन करण्यात आले यानंतर सज्जनगडावर समाधी मंदिर, अंगलाइदेवी मंदिर, श्रीधर कुटी या ठिकाणी भिक्षावळ संपन्न झाली समाधी महापूजा, छबीना, मुख्य राम मंदिर मानाच्या तेरा प्रदक्षणा खड्या आवाजात आरतीच्या जयघोषात घालण्यात आल्या श्रीधर कुठी येथेही धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
दास नवमी महोत्सवास बंदी असल्याने भाविकांचा हिरमोड
परळी खोर्याला दरवर्षी आस लागून राहिलेली असते ती असते दास नवमी ची हजारो भाविकांनी गजबजणारा सज्जनगड यंदा कोरोना मुळे काही मोजक्याच असणारे सेवेकर यांच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने दर्शनास न जाता आल्याने परळी खोऱ्यातील ग्रामस्थांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.