वार्ताहर
परळी
कोरोनाने दुसर्या लाटेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर साताऱ्याला ही आपल्या मगरमिठीत घेतले होते. अडीच हजारांच्या जवळपास उच्चांकी आकडा हा एका दिवसात साताऱ्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आकडेवारीही तीन अंकावर स्थिरावली असल्याने जिल्हावासियांनी निश्वास सोडला आहे. मात्र वीकेंड लॉकडाऊन हा सुरू असल्याने या दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांची परळी प्राथमिक आरोग्य केंद्र परळी अंतर्गत rt-pcr तसेच रॅट टेस्ट केली जात आहे.
शनिवारी पहिला दिवस असल्याने परळी खोऱ्यातील विनाकारण फिरणाऱ्या व सर्व व्यापारी वर्ग वाहनधारकांची rt-pcr 36 तर 87 रॅट टेस्टिंग घेण्यात आली. यावेळी परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच नंदकुमार धोत्रे व सर्व ग्रापंचायत सदस्य तसेच परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उर्मिला बनगर,डॉ.रोहिणी सुर्वे. लॅब टेक्नीशियन जाधव, आरोग्य कर्मचारी महेश भोसले व आशा शिंदे उपस्थित होते.
यावेळी परळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विनाकारण फिरणार यांची टेस्ट घेतली जात होतीच त्याचबरोबर घराबाहेर विनाकारण पडू नका तसेच सामाजिक अंतर पाळणे मास्क वापरणे सॅनिटायझर चा वेळोवळी वापर करणे अशा देखील सूचना यावेळी करण्यात आल्या.