Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedअतीवृष्टीने घराची पडझड होवून महिला गंभीर जखमी नित्रळ येथील घटना :...

अतीवृष्टीने घराची पडझड होवून महिला गंभीर जखमी नित्रळ येथील घटना : महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

वार्ताहर

परळी

परळी खोऱयात गेल्या आठवडय़ापासून पावसाची तीव्रता जास्त असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोठे रस्ता खचणे, दरडी पडने तर कोठे पुल वाहून जाने यासारख्या घटना घडत असताना नित्रळ (ता. सातारा) येथे अतिवृष्टीने घराची पडझड झाली असून यामध्ये नंदा चंद्रकांत वांगडे (वय-50) ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जिल्हय़ात पावसाने सर्वांचीच त्रेधातीरपीठ उडवली असून शहरी भागात थोडी उसंत घेतली असली तरी पश्चिम भागात पावसाचा मारा हा चांगलाच होत असल्याने ओढय़ांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तर काही ठिकाणी तर घराला उफळे फुटू लागले आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना नित्रळ येथील नंदा चंद्रकांत वांगडे ह्या घरातील कामकाज करत असताना पावसामुळे घराचा माळा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. कुटुंबियांनी तत्काळ ढिगारा बाजूला करत त्यांना अधिक उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular