Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीपाटणकर घराण्याची ऐतिहासिक काळापासून लोकहिताची परंपरा -: बाळासाहेब पवार.

पाटणकर घराण्याची ऐतिहासिक काळापासून लोकहिताची परंपरा -: बाळासाहेब पवार.

पाटण:- ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पाटणकर घराण्यातील पराक्रमी योद्ध्यानी स्वराज्यासाठी दिलेले योगदान मोलाचे असून छत्रपती शिवरायांनीही पाटणकर घराण्याच्या कामगिरीचा केलेला गौरव म्हणजे पाटणकर घराण्याच्या कर्तुत्वाचा इतिहास आहे.श्रीमंत सरदार भीमराव पाटणकर यांचे विचार आणि वारसा आजच्या तरूणपिढीला प्रेरणादायी आहे.पाटणकर घराण्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि लोककल्याणाची परंपरा जपून रयतेच्या हिताचा कारभार करणारे मेजर सरदार भीमराव पाटणकर लोकहितैषी प्रजापालक होते. ऐतिहासिक काळापासून पाटणकर घराण्याने लोकहिताची परंपरा कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन जेष्ट पत्रकार बाळासाहेब पवार यांनी केले.

येथील मेजर सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर विद्यालयात मेजर सरदार भीमराव पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर होते. यावेळी संजय इंगवले, मुख्याध्यापक शंकरराव जाधव, उपशिक्षक बळीराम सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अमरसिंह पाटणकर म्हणाले. भाऊसाहेब पाटणकर यांचे विचार आजच्या पिढीसाठी मौलिक विचारांचा पाया आहेत. आज विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्यांना सामाजिक बांधिलकीचे भान समजून सांगण्याची गरज आहे. आजच्या पिढीच्या यशस्वी जीवनाचा पाया संस्कारच असून या संस्कारक्षम मार्गावरील वाटचालच महत्त्वाची आहे. लोकहितासाठी झटणाऱ्या भाऊसाहेब पाटणकर यांनी जीवनात काटकसर व प्रगती कशी करावी याचे धडे दिले. पाटण तालुक्यात रानोमाळ भटकून आपली उपजिवीका करणाऱ्या धनगर समाजाला भाऊसाहेबांनी आपल्या जहागिरीतील जमिनी देऊन स्वावलंबी बनविले. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात  शेतकऱ्यांसाठी मुंबई इलाख्यातील पहिली गजरामाता सोसायटी स्थापन केली. नागोजीराव मार्केट तसेच वाचनालयासह रयतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले.

यावेळी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश मिळविलेल्या शाळेच्या ४३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी स्व.भीमराव पाटणकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृतमधून भाषणे सादर केली. मुख्याध्यापक शंकरराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक जगन्नाथ शेळके यांनी केले. उपशिक्षक अशोक कदम यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षिका,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular